YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 14:19-35

नीतिसूत्रे 14:19-35 MARVBSI

दुर्जन सज्जनांपुढे नमतात, दुष्ट लोक नीतिमानाच्या दारापुढे नमतात. गरिबाचा द्वेष त्याचा शेजारीही करतो, पण श्रीमंताला चाहणारे बहुत असतात. जो आपल्या शेजार्‍याचा तिरस्कार करतो तो पापी होय, पण गरिबांवर दया करतो तो धन्य होय. दुष्टपणाची मसलत करणारे भ्रांत नव्हत काय? चांगल्याची मसलत करणार्‍यांना दया व सत्य ही प्राप्त होतात. सर्व श्रमात लाभ आहे, पण तोंडाच्या वटवटीने दारिद्र्य येते. सुज्ञांचे धन त्यांचा मुकुट आहे; मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच राहते. खरा साक्षी लोकांचे प्राण सोडवतो; पण जो आपल्या मुखावाटे लबाडी उच्चारतो तो दगलबाजी करतो. परमेश्वराचे भय धरल्याने श्रद्धा दृढ होते; आणि ज्याच्या ठायी श्रद्धा असते त्याच्या मुलांना ती आश्रयस्थान होते. परमेश्वराचे भय जीवनाचा झरा होय, ते मृत्युपाश चुकवते. प्रजावृद्धीत राजाचे वैभव असते; प्रजा नसल्याने अधिपतीचा नाश होतो. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान होय; उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रकट करतो. शांत अंत:करण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात. जो गरिबाला छळतो तो आपल्या उत्पन्नकर्त्याचा अवमान करतो; पण जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो. विपत्ती आली असता दुर्जन चीत होतो, पण नीतिमानास मरणसमयीही उमेद असते. बुद्धिमानाच्या अंत:करणात ज्ञान स्थिर असते, पण मूर्खाच्या अंतर्यामीची गोष्ट तेव्हाच कळते. नीतिमत्ता राष्ट्राची उन्नती करते; पापाने प्रजेची अप्रतिष्ठा होते. शहाण्या सेवकावर राजाचा प्रसाद होतो, पण निर्लज्जपणे वागणार्‍यांवर तो रुष्ट होतो.