YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 13:13-25

नीतिसूत्रे 13:13-25 MARVBSI

वचन तुच्छ मानणारा स्वत:वर अनर्थ आणतो, पण आज्ञेचा धाक बाळगणार्‍यास चांगले प्रतिफळ मिळते. सुज्ञाचा बोध जीवनाचा झरा आहे, तो मृत्युपाश चुकवतो. समंजसपणाने कृपा संपादता येते, पण कपटी इसमांचा मार्ग खडतर असतो. प्रत्येक शहाणा मनुष्य अकलेने काम करतो, पण मूर्ख मनुष्य मूर्खतेचा पसारा मांडतो. दुष्ट जासूद संकटांत पडतो; पण विश्वासू वकील एक औषधी आहे. बोधाचा अव्हेर करणार्‍याला दारिद्र्य व लज्जा ही प्राप्त होतात, परंतु वाग्दंड ऐकणारा सन्मान पावतो. इच्छातृप्ती जिवाला गोड वाटते, पण वाईट सोडून देण्याचा मूर्खाला वीट आहे. सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो. पाप्यांच्या पाठीस अरिष्ट लागते, पण नीतिमानांस कल्याणरूप प्रतिफळ मिळते. चांगला मनुष्य आपल्या पुत्रपौत्रांना वतन ठेवतो, पण पाप्यांचे धन नीतिमानासाठी साठवलेले असते. गरिबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते; तरी अन्यायामुळे कित्येकांचा नाशही होतो. जो आपली छडी आवरतो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करतो तो त्याच्यावर प्रीती करणारा होय. नीतिमान पोटभर जेवतो, परंतु दुर्जनांचे पोट रिते राहते.