ज्याला ज्ञान प्रिय, त्याला शिक्षण प्रिय, पण जो वाग्दंड तुच्छ लेखतो तो पशुतुल्य होय. सज्जनाला परमेश्वराचा प्रसाद घडतो, परंतु दुष्टपणाच्या युक्ती योजणार्याला तो दोषी ठरवतो. मनुष्य दुष्टतेने स्थिर होत नाही, पण नीतिमानांचे मूळ ढळत नाही. सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे, पण लाज आणणारी स्त्री त्याची हाडे सडवणारी आहे. नीतिमानांचे विचार यथान्याय असतात; दुर्जनांच्या मसलती कपटाच्या असतात. दुर्जनांचे भाषण रक्तपातासाठी टपून बसलेले असते, पण सरळांचे मुख त्यांना सोडवील. दुर्जन उलथे पडून नष्ट होतात, परंतु नीतिमानांचे घर टिकते. मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण ज्याचे हृदय कुटिल असते त्याचा तिरस्कार होतो. जो आपणास प्रतिष्ठित समजतो पण अन्नाला मोताद असतो त्यापेक्षा ज्याची प्रतिष्ठा बेताची असून ज्याच्या पदरी सेवक असतो तो चांगला समजायचा. नीतिमान मनुष्य आपल्या पशूच्या जिवाकडे लक्ष देतो, पण दुर्जनांचे अंतर्याम क्रूर असते. जो आपले शेत स्वत: करतो त्याला भरपूर अन्न मिळते. परंतु जो निरर्थक गोष्टींमागे लागतो तो अक्कलशून्य होय. दुष्ट लोकांना मिळणार्या लुटीची इच्छा दुर्जन करतो, परंतु नीतिमानांचे मूळ फळ देते. मुखातील वाणीचा अपराध दुर्जनाला पाश आहे, परंतु नीतिमान संकटातून निभावतो. आपल्या मुखातून निघालेल्या गोष्टींच्या योगे मनुष्य तृप्त होतो, आणि मनुष्याला आपल्या हातच्या कर्माचे प्रतिफल मिळते.
नीतिसूत्रे 12 वाचा
ऐका नीतिसूत्रे 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 12:1-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ