एक इसम व्यय करतो तरी त्याची वृद्धीच होते, एक वाजवीपेक्षा फाजील काटकसर करतो, तरी तो भिकेस लागतो. उदार मनाचा समृद्ध होतो; जो पाणी पाजतो त्याला स्वत:ला ते पाजण्यात येईल. जो धान्य अडकवून ठेवतो त्याला लोक शाप देतात; जो ते विकतो त्याच्या मस्तकी आशीर्वाद येईल. जो झटून हित साधू पाहतो तो कृपाप्रसाद साधतो; जो अरिष्टाच्या शोधात असतो त्याला तेच प्राप्त होईल. जो आपल्या धनावर भरवसा ठेवतो तो पडेल, पण नीतिमान नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होतील. जो घरच्यांना दु:ख देतो त्याच्या वाट्याला वारा येईल; मूर्ख मनुष्य शहाण्याचा चाकर होईल. नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो ज्ञानी असतो तो जिवास वश करतो. पाहा, नीतिमानाला पृथ्वीवर त्याच्या कर्माचे फळ मिळते, तर मग दुर्जनाला व पातक्याला कितीतरी जास्त मिळेल!
नीतिसूत्रे 11 वाचा
ऐका नीतिसूत्रे 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 11:24-31
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ