YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 11:24-31

नीतिसूत्रे 11:24-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

एक इसम व्यय करतो तरी त्याची वृद्धीच होते, एक वाजवीपेक्षा फाजील काटकसर करतो, तरी तो भिकेस लागतो. उदार मनाचा समृद्ध होतो; जो पाणी पाजतो त्याला स्वत:ला ते पाजण्यात येईल. जो धान्य अडकवून ठेवतो त्याला लोक शाप देतात; जो ते विकतो त्याच्या मस्तकी आशीर्वाद येईल. जो झटून हित साधू पाहतो तो कृपाप्रसाद साधतो; जो अरिष्टाच्या शोधात असतो त्याला तेच प्राप्त होईल. जो आपल्या धनावर भरवसा ठेवतो तो पडेल, पण नीतिमान नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होतील. जो घरच्यांना दु:ख देतो त्याच्या वाट्याला वारा येईल; मूर्ख मनुष्य शहाण्याचा चाकर होईल. नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो ज्ञानी असतो तो जिवास वश करतो. पाहा, नीतिमानाला पृथ्वीवर त्याच्या कर्माचे फळ मिळते, तर मग दुर्जनाला व पातक्याला कितीतरी जास्त मिळेल!

सामायिक करा
नीतिसूत्रे 11 वाचा

नीतिसूत्रे 11:24-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तेथे कोणी एकजन बी पेरतो तो अधिक गोळा करतो; दुसरा पेरीत नाही तो दरिद्री होईल. उदार मनाचा इसम समृद्ध होतो, आणि जो दुसऱ्याला पाणी पाजतो त्यास स्वतःला ते पाजण्यात येईल. जो मनुष्य त्याचे धान्य विकायला नकार देतो त्यास लोक शाप देतात, पण जो ते विकतो त्याच्या मस्तकी चांगल्या दानाचा मुकुट प्राप्त होईल. जो कोणी परिश्रमाने चांगल्याचा शोध घेतो तो अनुग्रहाचा शोध करतो, पण जो कोणी वाईटाचा शोध घेतो त्यास तेच प्राप्त होईल. जो कोणी आपल्या श्रीमंतीवर विश्वास ठेवतो तो पडेल, परंतु नीतिमान पानाप्रमाणे झपाट्याने वाढेल. जो कोणी आपल्या स्वतःच्या घरावर संकटे आणतो त्याचे वतन वारा होईल, आणि मूर्ख मनुष्य शहाण्याच्या हृदयाचा सेवक होईल. नीतिमानाचे जीवन वृक्षासारखे आहे, पण हिंसाचार जीवन दूर नेतो. जर नीतिमानाला त्याच्या लायकीप्रमाणे फळ मिळते; तर दुर्जनाला व पाप्याला किती अधिक मिळेल!

सामायिक करा
नीतिसूत्रे 11 वाचा

नीतिसूत्रे 11:24-31

नीतिसूत्रे 11:24-31 MARVBSIनीतिसूत्रे 11:24-31 MARVBSIनीतिसूत्रे 11:24-31 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा