मला प्रभूच्या ठायी मोठा आनंद झाला की, आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली; ही काळजी तुम्ही करीतच होता; पण तुम्हांला संधी नव्हती. मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही; कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते; हरएक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, ह्याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे. तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झालात हे ठीक केलेत. फिलिप्पैकरांनो, तुम्हांलाही ठाऊक आहे की, सुवार्तेच्या प्रारंभी, मी मासेदोनियाहून निघालो तेव्हा तुमच्यावाचून दुसर्या कोणत्याही मंडळीने माझ्याबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाही; कारण मी थेस्सलनीकात होतो तेव्हादेखील तुम्ही एकदाच नाही तर दोनदा माझी गरज भागवली. मी दानाची अपेक्षा करतो असे नाही; तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. मला सर्वकाही आहे व ते विपुल आहे; एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले त्याने मी भरून गेलो आहे. ते जणू काय सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक1 यज्ञ, असे आहे. माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील. आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र जनाला सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हांला सलाम सांगतात. सर्व पवित्र जन व विशेषेकरून कैसराच्या घरचे तुम्हांला सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचा
ऐका फिलिप्पैकरांस पत्र 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: फिलिप्पैकरांस पत्र 4:10-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ