मला प्रभूच्या ठायी मोठा आनंद झाला की, आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली; ही काळजी तुम्ही करीतच होता; पण तुम्हांला संधी नव्हती. मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही; कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते; हरएक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, ह्याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे. तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झालात हे ठीक केलेत.
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचा
ऐका फिलिप्पैकरांस पत्र 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: फिलिप्पैकरांस पत्र 4:10-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ