परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला सांग की, तू दिवे पेटवशील तेव्हा सातही दिव्यांचा प्रकाश दीपवृक्षाच्या पुढल्या बाजूला पडावा.” अहरोनाने तसे केले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे दीपवृक्षाच्या पुढच्या बाजूला प्रकाश पडावा म्हणून त्याने दिवे उजळले. दीपवृक्षाचे काम घडीव सोन्याचे होते; बैठकीपासून फुलांपर्यंत घडीव काम होते; परमेश्वराने मोशेला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे त्याने तो दीपवृक्ष घडवला होता. परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांमधून लेव्यांना वेगळे करून शुद्ध कर. तू त्यांना शुद्ध करण्यासाठी असे कर : पापक्षालनाच्या जलाचे त्यांच्यावर सिंचन कर; मग त्यांनी आपल्या सगळ्या अंगावर वस्तरा फिरवावा, आपली वस्त्रे धुवावीत आणि स्वत:ला शुद्ध करावे. मग त्यांनी एक गोर्हा व त्यासोबतचे अन्नार्पण म्हणजे मळलेले पीठ घेऊन यावे; आणि तू पापार्पणासाठी आणखी एक गोर्हा आणावा. मग तू लेव्यांना दर्शनमंडपासमोर सादर करावे आणि इस्राएल लोकांची सर्व मंडळी तेथे जमवावी; लेव्यांना तू परमेश्वरासमोर सादर करत असताना इस्राएल लोकांनी आपले हात त्यांच्यावर ठेवावेत; लेव्यांनी परमेश्वराची सेवा करावी म्हणून इस्राएल लोकांच्या वतीने अहरोनाने त्यांना ओवाळणी म्हणून परमेश्वरासमोर अर्पावे.1 तेव्हा लेव्यांनी आपले हात गोर्ह्याच्या डोक्यांवर ठेवावेत; आणि लेव्यांप्रीत्यर्थ प्रायश्चित्त करण्यासाठी तू एक गोर्हा पापार्पण व दुसरा होमार्पण म्हणून परमेश्वराला अर्पावा. मग लेव्यांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यासमोर उभे करून परमेश्वराला ओवाळणी म्हणून अर्पावे. ह्या प्रकारे तू लेव्यांना इस्राएल लोकांमधून वेगळे करावे म्हणजे लेवी माझे होतील.
गणना 8 वाचा
ऐका गणना 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 8:1-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ