YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 7:1-11

गणना 7:1-11 MARVBSI

मग मोशेने निवासमंडप उभा करण्याचे संपवले आणि तो मंडप व त्यातील सर्व सामान हे तैलाभ्यंग करून पवित्र केले, आणि वेदी व तिची सर्व उपकरणे हीसुद्धा तैलाभ्यंग करून पवित्र केली; तेव्हा असे झाले की, इस्राएलाचे सरदार जे आपापल्या पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांनी अर्पणे आणली; हे वंशांचे सरदार असून खानेसुमारी केलेल्या लोकांवर त्यांची देखरेख होती; त्यांनी परमेश्वराला अर्पण आणले ते हे : आच्छादलेल्या सहा गाड्या आणि बारा बैल म्हणजे दोघा-दोघा सरदारांमागे एक गाडी आणि प्रत्येक सरदारामागे एक बैल; त्यांनी ती निवासमंडपासमोर सादर केली. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्यांच्यापासून ती स्वीकार म्हणजे दर्शनमंडपाच्या सेवेसाठी त्यांचा उपयोग होईल आणि ती लेव्यांना ज्याच्या-त्याच्या सेवेप्रमाणे वाटून दे.” तेव्हा मोशेने त्या गाड्या व बैल घेऊन लेव्यांना दिले. गेर्षोनाच्या वंशजांना त्यांच्या सेवेप्रमाणे दोन गाड्या आणि चार बैल दिले. मरारीच्या वंशजांना त्यांच्या सेवेप्रमाणे चार गाड्या व आठ बैल दिले; हे अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या हाताखाली होते. पण कहाथाच्या वंशजांना काही दिले नाही, कारण पवित्रस्थानातल्या वस्तू खांद्यांवर वाहून नेण्याची सेवा त्यांना नेमून दिलेली होती. वेदीचा तैलाभ्यंग झाला त्या दिवशी सरदारांनी तिच्या समर्पणाचे अर्पण म्हणून ते बैल आणि गाड्या सादर केल्या. म्हणजे सरदारांनी आपले अर्पण वेदीपुढे सादर केले. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला की, “वेदीच्या समर्पणासाठी सरदारांनी आपापले अर्पण प्रत्येकाला नेमून दिलेल्या दिवशी सादर करावे.”