मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांपैकी अहरोन याजकाचा नातू, एलाजाराचा मुलगा फीनहास ह्याने त्यांच्यामध्ये माझ्या ईर्ष्येने पेटून इस्राएल लोकांवरील माझा संताप दूर केला म्हणून मी आपल्या ईर्ष्येने त्यांचा संहार केला नाही. म्हणून त्याला असे सांग की, मी त्याच्याशी आपला शांतीचा करार करतो. त्याच्यासाठी व त्याच्यामागून त्याच्या संततीसाठी हा निरंतरचा याजकपदाचा करार होय; कारण आपल्या देवाविषयी तो ईर्ष्यावान होऊन त्याने इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित्त केले.” मिद्यानी बाईबरोबर ठार मारण्यात आलेल्या इस्राएली पुरुषाचे नाव जिम्री होते. हा सालूचा मुलगा असून शिमोनी वंशातला आपल्या वडिलांच्या घराण्यातील सरदार होता. जिवे मारण्यात आलेल्या मिद्यानी बाईचे नाव कजबी होते; एका मिद्यानी घराण्याचा प्रमुख सूर ह्याची ती मुलगी होती. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “मिद्यान्यांचा पिच्छा पुरवून त्यांच्यावर मारा कर; कारण पौराच्या बाबतीत व कजबीच्या बाबतीत त्यांनी तुम्हांला भुरळ घालून त्रस्त केले आहे.” कजबी ही एका मिद्यानी सरदाराची मुलगी असून मिद्यान्यांची जातबहीण होती; पौरामुळे मरी उद्भवली त्या दिवशी तिला जिवे मारले.
गणना 25 वाचा
ऐका गणना 25
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 25:10-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ