अथारीमच्या वाटेने इस्राएल लोक येत आहेत असे नेगेब प्रदेशात राहणार्या अरादाच्या कनानी राजाने ऐकले, तेव्हा त्याने इस्राएलांशी युद्ध करून कित्येकांना कैद केले. तेव्हा इस्राएलाने परमेश्वराला असा नवस केला की, “जर तू खरोखर ह्या लोकांना माझ्या हाती देशील तर मी त्यांच्या नगरांचा समूळ नाश करीन.” इस्राएलाचे हे म्हणणे ऐकून परमेश्वराने कनानी लोकांना त्याच्या हाती दिले आणि त्याने त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला; म्हणून त्या ठिकाणाचे नाव हर्मा (म्हणजे विनाश) असे पडले. मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला; त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध असे बोलू लागले की, “तुम्ही आम्हांला मिसर देशातून काढून ह्या रानात मरायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही, आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत.” तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आग्ये साप पाठवले; त्यांच्या दंशाने इस्राएलातील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, “परमेश्वराविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे; तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, “आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल.” मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला, तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगे.
गणना 21 वाचा
ऐका गणना 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 21:1-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ