तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. वास्तविक, मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिम्याने भरलेली आहे; आणि ह्या सर्व लोकांनी माझा महिमा आणि मिसर देशात व रानात मी केलेली चिन्हे पाहूनही दहादा माझी परीक्षा पाहिली आणि माझे सांगणे ऐकले नाही; म्हणून जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो खरोखर त्यांच्या दृष्टीस पडायचा नाही; ज्यांनी मला तुच्छ लेखले त्यांतले कोणीही तो देश पाहणार नाहीत. तथापि माझा सेवक कालेब ह्याची वृत्ती निराळी आहे आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे, म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला नेईन व तो देश त्याच्या वंशजांचे वतन होईल. अमालेकी व कनानी ह्यांची वस्ती तळवटीत असल्यामुळे उद्या वळसा घेऊन कूच करा आणि तांबड्या समुद्राच्या मार्गाने रानात जा.” परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, “ही दुष्ट मंडळी कोठवर माझ्याविरुद्ध कुरकुर करीत राहणार? हे जे इस्राएल लोक माझ्याविरुद्ध कुरकुर करीत आहेत त्यांची कुरकुर माझ्या कानावर आली आहे; म्हणून तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो : ‘माझी शपथ, तुमचे म्हणणे माझ्या कानी आले आहे त्याप्रमाणेच मी तुमचे खरोखर करीन; तुमची प्रेते ह्या रानात पडतील, आणि तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील वीस वर्षे व त्यांहून अधिक वयाच्या ज्या लोकांनी माझ्याविरुद्ध कुरकुर केली आहे त्यांपैकी कोणीही ज्या देशात तुम्हांला घेऊन जाण्याची मी शपथ वाहिली आहे त्यात जाणारच नाही; पण यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा हे मात्र जातील. ज्या तुमच्या मुलाबाळांविषयी तुम्ही म्हणालात की, ह्यांची लूट होईल, त्यांना मी त्या देशास नेईन आणि जो देश तुम्ही तुच्छ मानला आहे तो देश ते भोगतील; पण तुमची स्वत:ची प्रेते ह्या रानात पडतील. तुमची प्रेते ह्या रानात नष्ट होईपर्यंत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगत रानात भटकणार्या मेंढपाळासारखी होतील. देश हेरायला जे चाळीस दिवस लागले त्यांतील प्रत्येक दिवसामागे एक वर्ष ह्या हिशेबाने चाळीस वर्षे तुम्ही आपल्या दुष्कर्माचा भार वाहाल, आणि माझा विरोध तुम्हांला भोवेल.’ मी परमेश्वर हे बोललो आहे. ही जी सर्व दुष्ट मंडळी माझ्याविरुद्ध जमली आहे तिचे मी असे खरोखर करीन; त्यांचा ह्या रानात विध्वंस होईल; ते तेथे मरून जातील.” नंतर मोशेने देश हेरायला पाठवलेल्या ज्या पुरुषांनी परत येऊन त्या देशाविषयी अनिष्ट बातमी सांगितली होती आणि सर्व मंडळीला परमेश्वराविरुद्ध कुरकुर करायला चिथावले होते, ते देशाची अनिष्ट बातमी देणारे पुरुष परमेश्वरासमोर मरीने मृत्यू पावले. तथापि देश हेरायला गेलेल्या पुरुषांपैकी नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब हे जिवंत राहिले.
गणना 14 वाचा
ऐका गणना 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 14:20-38
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ