परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू चांदीचे दोन कर्णे बनव; ते घडीव कामाचे असावेत; मंडळीला बोलावण्यासाठी आणि तळ उठवण्यासाठी त्यांचा तू उपयोग करावास. हे दोन्ही कर्णे वाजवले म्हणजे सर्व मंडळीने तुझ्यासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ जमावे. एकच कर्णा वाजवला तर सरदारांनी म्हणजे इस्राएलाच्या घराण्यातील1 प्रमुखांनी तुझ्यासमोर जमावे. कर्ण्याचा मोठा गजर केला म्हणजे पूर्वेच्या छावण्यांनी कूच करावे; असाच दुसर्यांदा मोठा गजर केला म्हणजे दक्षिणेच्या छावण्यांनी कूच करावे; कूच करायचे असले तर कर्ण्याचा एक मोठा गजर करावा. मंडळी एकत्र बोलवायची असल्यास कर्णा वाजवावा, पण मोठा गजर करू नये. अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी हे कर्णे वाजवावेत; हा तुम्हांला पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. तुमच्या देशात तुमच्यावर जुलूम करणार्या शत्रूंशी तुम्ही लढायला निघाल तेव्हा तुम्ही कर्ण्यांचा मोठा गजर करा; म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याला तुमची आठवण होईल आणि तुमच्या शत्रूंपासून तुमचा बचाव होईल. आपल्या आनंदाच्या दिवशी, नेमलेल्या सणांच्या दिवशी आणि प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस आपले होमबली व शांत्यर्पणाचे बली अर्पण करत असताना हे कर्णे वाजवावेत; ते तुमच्या देवाला तुमची आठवण करून देतील; मी परमेश्वर तुमचा देव आहे.”
गणना 10 वाचा
ऐका गणना 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 10:1-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ