YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 9:32-37

नहेम्या 9:32-37 MARVBSI

तर आता हे आमच्या देवा, हे थोर, पराक्रमी व भयावह देवा, आपला करार व दया कायम राखणार्‍या देवा, अश्शूरी राजाच्या काळापासून आजपर्यंत आम्हांला, आमच्या राजांना, आमच्या अधिपतींना, आमच्या याजकांना, आमच्या संदेष्ट्यांना, आमच्या वाडवडिलांना आणि तुझ्या सर्व लोकांना जे कष्ट झाले आहेत ते क्षुल्लक लेखू नकोस. आमच्यावर जे काही गुदरले आहे त्याच्या बाबतीत तू न्यायशील आहेस; तू आमच्याशी सत्यतेने वागलास पण आम्ही दुष्टाई केली आहे. आमचे राजे, अधिपती, याजक आणि वाडवडील ह्यांनी तुझे नियमशास्त्र पाळले नाही, आणि आपल्या ज्या आज्ञांच्या व निर्बंधांच्या योगे तू त्यांना बजावले त्यांकडे त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी आपल्या राज्यात तुझी सेवा केली नाही; तू त्यांचे मोठे कल्याण केलेस, आणि तू त्यांना विस्तृत व सुपीक भूमी दिली, तरीही तुझी सेवा त्यांनी केली नाही आणि आपल्या दुष्कर्मापासून ते परावृत्त झाले नाहीत. पाहा, आज आम्ही दास बनलो आहोत; आमच्या पूर्वजांनी उत्तम उत्पन्न उपभोगावे म्हणून जो देश तू त्यांना दिलास त्यात आम्ही केवळ दास आहोत. आमच्या पापांमुळे जे राजे तू आमच्यावर नेमले आहेत त्यांना ह्या देशाचे पुष्कळ उत्पन्न मिळत आहे; ते आमच्या देहांवर व आमच्या गुराढोरांवर हवी तशी सत्ता चालवत आहेत; आम्ही फार फार संकटात आहोत.”