YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 13:32-37

मार्क 13:32-37 MARVBSI

आणखी त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे. सावध असा, जागृत राहा व प्रार्थना करा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हांला ठाऊक नाही. प्रवासाला जात असलेल्या कोणाएका माणसाने आपले घर सोडतेवेळी आपल्या नोकरांना अधिकार देऊन ज्याचे त्याला काम नेमून द्यावे व द्वारपाळास जागृत राहण्याची आज्ञा करावी तसे हे आहे. म्हणून जागृत राहा; कारण घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्रीस, कोंबडा आरवण्याच्या वेळी किंवा सकाळी हे तुम्हांला माहीत नाही; नाहीतर अकस्मात येऊन तो तुम्हांला झोपा काढत असलेले पाहील. जे मी तुम्हांला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.”

मार्क 13:32-37 साठी चलचित्र