YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 1:40-45

मार्क 1:40-45 MARVBSI

तेव्हा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.” तेव्हा येशूला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” तेव्हा तो बोलता क्षणीच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग त्याने त्याला ताकीद देऊन ताबडतोब लावून दिले, आणि सांगितले, “पाहा, कोणाला काही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि लोकांना प्रमाण पटावे म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.” पण त्याने तेथून जाऊन घोषणा करून करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना; म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला; तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच.

मार्क 1:40-45 साठी चलचित्र