मग ते यरीहोहून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून चालला. तेव्हा पाहा, वाटेवर बसलेले दोन आंधळे येशू जवळून जात आहे हे ऐकून ओरडून म्हणाले, “हे प्रभो, दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा.” त्यांनी उगे राहावे म्हणून लोकांनी त्यांना धमकावले; तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, “प्रभो, दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा.” येशूने उभे राहून त्यांना बोलावून म्हटले, “मी तुमच्यासाठी काय करू? तुमची काय इच्छा आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, आमचे डोळे उघडावे.”
मत्तय 20 वाचा
ऐका मत्तय 20
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 20:29-33
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ