YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 20:29-33

मत्तय 20:29-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

ते यरीहो शहर सोडत असताना, मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे आला. रस्त्याच्या कडेला दोन आंधळे बसले होते आणि जेव्हा त्यांनी ऐकले की, येशू तेथून जात आहे, तेव्हा ते मोठ्याने ओरडले, “प्रभू येशू, दाविदाच्या पुत्रा. आमच्यावर दया करा.” जमावाने त्यांना दटावले व त्यांना शांत राहण्यास सांगितले. पण ते अधिकच मोठ्याने ओरडू लागले, “प्रभू, दाविदाच्या पुत्रा, आमच्यावर दया करा.” मग येशू थांबला आणि त्यांच्याशी बोलला, त्याने विचारले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” त्या आंधळ्या मनुष्यांनी उत्तर दिले, “प्रभूजी, आम्हास दिसावे अशी आमची इच्छा आहे.”

सामायिक करा
मत्तय 20 वाचा

मत्तय 20:29-33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशू व त्यांचे शिष्य हे यरीहो शहर सोडून जात असताना, त्यांच्यामागे खूप मोठी गर्दी चालली होती. दोन आंधळी माणसे रस्त्याच्या कडेला बसली होती. येशू आपल्या बाजूने येत आहेत, हे त्यांनी ऐकले, तेव्हा ते मोठ्याने ओरडू लागले, “प्रभू, दावीदाचे पुत्र! आम्हावर दया करा!” गर्दीतील लोकांनी त्यांना धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, तर ते अधिक मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले, “अहो प्रभू, दावीदाचे, पुत्र, आम्हावर दया करा!” येशू थांबले आणि त्यांनी आंधळ्यांना बोलाविले व ते म्हणाले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” “प्रभूजी,” त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला आमची दृष्टी यावी.”

सामायिक करा
मत्तय 20 वाचा