YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 11:1-6

मत्तय 11:1-6 MARVBSI

मग असे झाले की, येशूने आपल्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केल्यावर तो तेथून त्यांच्या नगरांत शिकवण्यास व उपदेश करण्यास गेला. योहान बंदिशाळेत असताना त्याने ख्रिस्ताच्या कृत्यांविषयी ऐकून आपल्या शिष्यांना पाठवून त्याला विचारले, “जे येणार आहेत ते आपणच, की आम्ही दुसर्‍याची वाट पाहावी?” येशूने त्यांना उत्तर दिले, “जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा; ‘आंधळे पाहतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते’; जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”