YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 6:43-49

लूक 6:43-49 MARVBSI

ज्याला वाईट फळ येईल असे कोणतेही चांगले झाड नाही; तसेच ज्याला चांगले फळ येईल असे कोणतेही वाईट झाड नाही. प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखू येते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढत नाहीत, आणि रूद्राक्षाच्या झाडांवरून कोणी द्राक्षाचा घड काढत नाहीत. चांगला मनुष्य आपल्या अंत:करणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाइटातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार. तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू’ म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही? जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे, हे मी तुम्हांला दाखवतो. तो कोणाएका घर बांधणार्‍या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला; मग पूर आला, तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला तरी त्यामुळे ते हालले नाही; कारण ते मजबूत बांधले होते. परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणार्‍या माणसासारखा आहे; त्या घरावर लोंढा आदळला तेव्हा ते लगेच पडले आणि त्या घराचा सत्यानाश झाला.”

लूक 6 वाचा

ऐका लूक 6