एके दिवशी असे झाले की, तो शिक्षण देत असताना गालीलातील प्रत्येक गावाहून आणि यहूदीया व यरुशलेम येथून आलेले परूशी व शास्त्राध्यापक तेथे बसले होते; आणि रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठायी होते. तेव्हा पाहा, कित्येक माणसांनी कोणाएका पक्षाघाती मनुष्याला बाजेवर आणले व त्याला आत नेऊन त्याच्यासमोर ठेवायचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु दाटीमुळे त्याला आत नेण्यास वाव मिळेना, म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला बाजेसकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले. तेव्हा त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, “हे मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” तेव्हा शास्त्री व परूशी असा वादविवाद करून म्हणाले की, “हा दुर्भाषण करणारा कोण आहे? केवळ देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो?” येशूने त्यांचे विचार ओळखून त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का करत आहात? ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘उठून चाल’ ह्यांतून कोणते म्हणणे सोपे? परंतु पृथ्वीवर पापांची क्षमा करण्यास मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून (तो पक्षाघाती मनुष्याला म्हणाला), मी तुला सांगतो, ऊठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा.” तेव्हा तो लगेचच त्यांच्यासमक्ष उठून ज्यावर तो पडून होता ते उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णीत आपल्या घरी गेला. तेव्हा ते सर्व अगदी थक्क झाले; ते देवाचा महिमा वर्णू लागले आणि फार भयभीत होऊन म्हणाले, “आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत.”
लूक 5 वाचा
ऐका लूक 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 5:17-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ