YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 23:50-56

लूक 23:50-56 MARVBSI

यहूद्यांच्या अरिमथाई नगरातला योसेफ नावाचा एक मनुष्य होता, तो न्यायसभेचा सदस्य असून सज्जन व नीतिमान होता. त्याने त्यांच्या विचाराला व कृत्याला संमती दिली नव्हती व तो देवाच्या राज्याची प्रतीक्षा करत होता. त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. ते त्याने खाली काढून तागाच्या वस्त्राने गुंडाळले व खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ह्या कबरेत अद्याप कोणाला ठेवले नव्हते. तो तयारी करण्याचा दिवस होता; आणि शब्बाथ सुरू होणार होता. गालीलाहून त्याच्याबरोबर आलेल्या स्त्रियांनी त्याच्यामागून येऊन ती कबर पाहिली व त्याचे शरीर कसे ठेवले हेही पाहिले. मग त्यांनी परत जाऊन सुगंधी द्रव्ये व सुवासिक तेले तयार केली. शब्बाथ दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या.