YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 20:20-26

लूक 20:20-26 MARVBSI

मग ते त्याच्या पाळतीवर राहिले आणि त्याला बोलण्यात धरून सुभेदाराच्या तावडीत व अधिकारात आणावे म्हणून त्यांनी नीतिमान असल्याची बतावणी केलेले हेर त्याच्याकडे पाठवले. त्यांनी त्याला म्हटले, “गुरूजी, आपण योग्य बोलता व शिक्षण देता, आणि तोंडदेखले बोलत नाही, तर देवाचा मार्ग सत्यास अनुसरून शिकवता हे आम्हांला माहीत आहे. आम्ही कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” तो त्यांचे कपट ओळखून त्यांना म्हणाला, “[तुम्ही माझी परीक्षा का पाहता?] मला एक नाणे दाखवा. ह्याच्यावरील मुखवटा व लेख कोणाचा आहे?” ते म्हणाले, “कैसराचा.” तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तर कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या.” तेव्हा त्यांना लोकांसमक्ष त्याला त्याच्या बोलण्यात धरता येईना, आणि त्याच्या उत्तराचे आश्‍चर्य वाटून ते स्तब्ध राहिले.

संबंधित व्हिडिओ