YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 20:20-26

लूक 20:20-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग ते त्याच्या पाळतीवर राहिले आणि त्याला बोलण्यात धरून सुभेदाराच्या तावडीत व अधिकारात आणावे म्हणून त्यांनी नीतिमान असल्याची बतावणी केलेले हेर त्याच्याकडे पाठवले. त्यांनी त्याला म्हटले, “गुरूजी, आपण योग्य बोलता व शिक्षण देता, आणि तोंडदेखले बोलत नाही, तर देवाचा मार्ग सत्यास अनुसरून शिकवता हे आम्हांला माहीत आहे. आम्ही कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” तो त्यांचे कपट ओळखून त्यांना म्हणाला, “[तुम्ही माझी परीक्षा का पाहता?] मला एक नाणे दाखवा. ह्याच्यावरील मुखवटा व लेख कोणाचा आहे?” ते म्हणाले, “कैसराचा.” तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तर कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या.” तेव्हा त्यांना लोकांसमक्ष त्याला त्याच्या बोलण्यात धरता येईना, आणि त्याच्या उत्तराचे आश्‍चर्य वाटून ते स्तब्ध राहिले.

सामायिक करा
लूक 20 वाचा

लूक 20:20-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तेव्हा त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली आणि त्यास बोलण्यांत धरून राज्यपालाच्या आणि अधिकाराच्या अधीन करावे म्हणून आपण प्रामाणिक धार्मिक आहोत असे भासविणारे हेर पाठवले. म्हणून त्या हेरांनी त्यास प्रश्न विचारला. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हास माहीत आहे की, जे योग्य ते तुम्ही बोलता व शिकविता आणि तुम्ही पक्षपात करीत नाही. तर सत्याने देवाचा मार्ग शिकविता. आम्ही कैसराला कर द्यावा हे योग्य आहे किंवा नाही?” ते धूर्तपणे आपल्याला फसवू पाहत आहेत याची येशूला कल्पना होती. म्हणून तो त्यांना म्हणाला, “मला एक नाणे दाखवा. यावर कोणाची प्रतिमा व लेख आहे?” ते म्हणाले, “कैसराचा.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला द्या.” तेव्हा लोकांसमोर तो जे काही बोलला त्यामध्ये त्यास धरणे त्यांना शक्य झाले नाही. त्याच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले आणि निरुत्तर झाले.

सामायिक करा
लूक 20 वाचा

लूक 20:20-26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्यांच्यावर बारकाईने पाळत ठेऊन, त्यांनी गुप्तहेरांना प्रामाणिक माणसे आहेत असे ढोंग करून त्यांच्याकडे पाठविले यासाठी की येशूंना त्यांच्या शब्दात पकडावे आणि त्यांना राज्यपालाच्या अधिकारकक्षेत आणावे. त्या गुप्तहेरांनी येशूंना प्रश्न विचारला: “गुरुजी, हे आम्हाला माहीत आहे की तुम्ही जे योग्य आहे ते बोलता व शिकविता आणि पक्षपात न करता परमेश्वराचा मार्ग सत्याने शिकविता. आम्ही कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” येशूंनी त्यांच्या मनातील कपट ओळखले आणि ते त्यांना म्हणाले, “मला एक नाणे दाखवा. या नाण्यावर कोणाचा मुखवटा आणि कोणाचे नाव आहे?” “कैसराचे,” त्यांनी उत्तर दिले. मग येशू म्हणाले, “कैसराचे ते कैसराला, जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.” अशा रीतीने लोकांपुढे त्यांना ते शब्दात पकडू शकले नाही. त्यांच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले आणि गप्प राहिले.

सामायिक करा
लूक 20 वाचा

लूक 20:20-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग ते त्याच्या पाळतीवर राहिले आणि त्याला बोलण्यात धरून सुभेदाराच्या तावडीत व अधिकारात आणावे म्हणून त्यांनी नीतिमान असल्याची बतावणी केलेले हेर त्याच्याकडे पाठवले. त्यांनी त्याला म्हटले, “गुरूजी, आपण योग्य बोलता व शिक्षण देता, आणि तोंडदेखले बोलत नाही, तर देवाचा मार्ग सत्यास अनुसरून शिकवता हे आम्हांला माहीत आहे. आम्ही कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” तो त्यांचे कपट ओळखून त्यांना म्हणाला, “[तुम्ही माझी परीक्षा का पाहता?] मला एक नाणे दाखवा. ह्याच्यावरील मुखवटा व लेख कोणाचा आहे?” ते म्हणाले, “कैसराचा.” तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तर कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या.” तेव्हा त्यांना लोकांसमक्ष त्याला त्याच्या बोलण्यात धरता येईना, आणि त्याच्या उत्तराचे आश्‍चर्य वाटून ते स्तब्ध राहिले.

सामायिक करा
लूक 20 वाचा

लूक 20:20-26 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

म्हणून ते त्याच्या पाळतीवर राहिले आणि त्याला बोलण्यात पकडून रोमन राज्यपालांच्या अधिकाराखाली व सत्तेखाली आणावे म्हणून त्यांनी प्रामाणिकपणाचे ढोंग केलेले हेर त्याच्याकडे पाठवले. त्यांनी त्याला म्हटले, “गुरुवर्य, आपल्या बोलण्यात व शिकवणीत आपण पक्षपात करीत नसता. किंबहुना आपण देवाचा मार्ग सत्यास अनुसरून शिकवता, हे आम्हांला माहीत आहे. आम्ही कैसरला कर द्यावा, हे योग्य आहे की नाही?” तो त्यांचे कपट ओळखून त्यांना म्हणाला, “मला एक नाणे दाखवा. ह्याच्यावरील मुद्रा व लेख कोणाचा आहे?” ते म्हणाले, “कैसरचा.” त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसरचे ते कैसरला व देवाचे ते देवाला द्या.” त्यांना त्याला लोकांसमक्ष त्याच्या बोलण्यात धरता येईना. त्याच्या उत्तराचे आश्चर्य वाटून ते स्तब्ध राहिले.

सामायिक करा
लूक 20 वाचा