YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 9:1-7

लेवीय 9:1-7 MARVBSI

आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे मुलगे आणि इस्राएलांचे वडील ह्यांना बोलावले; आणि त्याने अहरोनाला सांगितले, ‘पापार्पणासाठी एक दोषहीन गोर्‍हा व होमार्पणासाठी एक दोषहीन मेंढा घेऊन परमेश्वरासमोर अर्पण कर; आणि इस्राएल लोकांना सांग की, तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा, आणि होमार्पणासाठी एक गोर्‍हा व एक कोकरू आणा, ही दोन्ही एका वर्षाची व दोषहीन असावीत; आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी एक बैल, एक मेंढा आणि तेलात मळलेले अन्नार्पण आणा, कारण आज परमेश्वर तुम्हांला दर्शन देणार आहे.” मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी ते सर्व दर्शनमंडपाच्या दाराजवळ आणले आणि सर्व मंडळी जवळ येऊन परमेश्वरासमोर उभी राहिली. तेव्हा मोशे म्हणाला, “तुम्ही जे करावे म्हणून परमेश्वराने आज्ञा दिली ते हेच; आता परमेश्वराचे तेज तुमच्या दृष्टीस पडेल.” मोशेने अहरोनाला सांगितले, “वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्‍चित्त घे; आणि लोकांकडचे बलीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त कर; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे हे कर.”