त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरू आणले तर ती दोषहीन मादी असावी. त्याने पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणासाठी त्याचा वध करावा. याजकाने आपल्या बोटाने पापबलीचे थोडे रक्त घेऊन होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. आणि शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि वेदीवर असलेल्या हव्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ तिचा होम करावा; ह्या प्रकारे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.
लेवीय 4 वाचा
ऐका लेवीय 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लेवीय 4:32-35
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ