परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना सांग : सातव्या महिन्याची प्रतिपदा तुम्हांला परमविश्रामाची असावी; स्मरण देण्यासाठी त्या दिवशी रणशिंगे फुंकावीत व पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी तुम्ही अंगमेहनतीचे काही काम करू नये, तर परमेश्वराला हव्य अर्पावे.” परमेश्वराने मोशेला सांगितले, “त्याच सातव्या महिन्याच्या दशमीस प्रायश्चित्ताचा दिवस पाळावा; त्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे आणि परमेश्वराला हव्य अर्पावे. त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये, कारण हा प्रायश्चित्ताचा दिवस होय; त्या दिवशी तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर तुमच्यासाठी प्रायश्चित्त करण्यात येईल. त्या दिवशी जो मनुष्य आपल्या जिवाला दंडन करणार नाही त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. कोणाही मनुष्याने त्या दिवशी कसलेही काम केले तर मी त्याला स्वजनांतून नाहीसा करीन. तुम्ही कसलेही काम करू नये; तुमच्या सर्व निवासस्थानांतून तुम्हांला हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. तो दिवस तुम्हांला परमविश्रामाचा शब्बाथ व्हावा व तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे; त्या महिन्याच्या नवमीच्या संध्याकाळपासून दुसर्या संध्याकाळपर्यंत तुम्ही आपला शब्बाथ पाळावा.”
लेवीय 23 वाचा
ऐका लेवीय 23
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लेवीय 23:23-32
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ