परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना सांग, पवित्र मेळे भरवण्यासाठी परमेश्वराचे जे नेमलेले समय तुम्ही जाहीर करायचे ते माझे नेमलेले समय असे : सहा दिवस कामकाज करावे, पण सातवा दिवस परमविश्रामाचा शब्बाथ व पवित्र मेळ्याचा दिवस होय; ह्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये; तुमच्या सर्व घराघरांतून हा परमेश्वराचा शब्बाथ असावा. परमेश्वराचे जे नेमलेले समय म्हणजे पवित्र मेळ्याचे दिवस तुम्ही नियमित वेळी जाहीर करायचे ते हे : पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी परमेश्वराचा वल्हांडण सण येतो. त्याच महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराप्रीत्यर्थ बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो; त्यात तुम्ही सात दिवस बेखमीर भाकर खावी. पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये. सात दिवस तुम्ही परमेश्वराला हव्य अर्पावे; सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये.” परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना सांग : मी तुम्हांला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहचाल व त्यातील पीक कापाल, तेव्हा आपल्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी; ती पेंढी तुमच्यासाठी स्वीकारण्यात यावी म्हणून त्याने परमेश्वरासमोर ती ओवाळावी; शब्बाथाच्या पुढच्या दिवशी याजकाने ती ओवाळावी. पेंढी ओवाळाल त्या दिवशी दोषहीन अशा एक वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण करावे. त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या दोन दशमांश एफा सपिठाचे असावे; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय; आणि त्याबरोबरचे पेयार्पण म्हणून एक चतुर्थांश हिन द्राक्षारस अर्पावा. तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल त्या दिवसापर्यंत नव्या पिकाची भाकर किंवा हुरडा किंवा हिरवे धान्य खाऊ नये; तुमच्या सर्व घरा़घरांतून हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.
लेवीय 23 वाचा
ऐका लेवीय 23
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लेवीय 23:1-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ