मग त्याने इस्राएलाच्या मंडळीकडून पापार्पणासाठी दोन बकरे व होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा. अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा गोर्हा सादर करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी अर्पून प्रायश्चित्त करावे. मग त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर उभे करावेत. अहरोनाने त्या दोन बकर्यांवर चिठ्ठ्या टाकाव्यात; एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेण्यासाठी.1 ज्या बकर्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो अहरोनाने सादर करून पापार्पणादाखल बळी द्यावा. पण ज्या बकर्यावर पाप वाहून नेण्यासंबंधीची चिठ्ठी निघेल त्याला परमेश्वरासमोर जिवंत उभे करावे व त्याच्या द्वारे प्रायश्चित्त व्हावे, आणि तो बकरा पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा.
लेवीय 16 वाचा
ऐका लेवीय 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लेवीय 16:5-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ