YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 16:5-10

लेवीय 16:5-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग त्याने इस्राएलाच्या मंडळीकडून पापार्पणासाठी दोन बकरे व होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा. अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा गोऱ्हा अर्पण करून स्वत:साठी व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे. त्यानंतर त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे करावेत. अहरोनाने त्या दोन बकऱ्यावर चिठ्ठ्या टाकाव्या; एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेणाऱ्या बकऱ्यासाठी ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो बकरा अहरोनाने पापार्पण म्हणून अर्पण करावा; पाप वाहून नेण्यासाठी अशी चिठ्ठी निघालेला बकरा परमेश्वरासमोर जिवंत उभा करावा व त्याच्याद्वारे प्रायश्चित व्हावे म्हणून पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा.

सामायिक करा
लेवीय 16 वाचा

लेवीय 16:5-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग इस्राएली समुदायाकडून पापार्पणासाठी दोन बोकडे व होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा. “अहरोनाने स्वतःच्या पापार्पणाचा गोर्‍हा परमेश्वराला पहिल्याने अर्पण करून स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबासाठी प्रायश्चित्त करावे. मग त्याने सभामंडपाच्या दाराशी याहवेहपुढे ती दोन बोकडे आणावी. दोन बोकडांवर अहरोनाने चिठ्ठ्या टाकाव्या—याहवेहसाठी एक बोकड आणि पाप वाहून नेण्यासाठी दुसरा बोकड. नंतर याहवेहसाठी चिठ्ठी पडलेल्या बोकडाला अहरोनाने घेऊन यावे आणि पापार्पणाचा बळी म्हणून त्याचा यज्ञ करावा. परंतु चिठ्ठी टाकून जो दुसरा बोकड आला तो पाप वाहून नेण्यासाठीचा बोकड जिवंत ठेवून याहवेहसमोर आणावा आणि त्याच्यावर प्रायश्चित्ताचा विधी करून, पाप वाहून नेण्यासाठी तो रानात सोडून द्यावा.

सामायिक करा
लेवीय 16 वाचा

लेवीय 16:5-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग त्याने इस्राएलाच्या मंडळीकडून पापार्पणासाठी दोन बकरे व होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा. अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा गोर्‍हा सादर करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी अर्पून प्रायश्‍चित्त करावे. मग त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर उभे करावेत. अहरोनाने त्या दोन बकर्‍यांवर चिठ्ठ्या टाकाव्यात; एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेण्यासाठी.1 ज्या बकर्‍यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो अहरोनाने सादर करून पापार्पणादाखल बळी द्यावा. पण ज्या बकर्‍यावर पाप वाहून नेण्यासंबंधीची चिठ्ठी निघेल त्याला परमेश्वरासमोर जिवंत उभे करावे व त्याच्या द्वारे प्रायश्‍चित्त व्हावे, आणि तो बकरा पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा.

सामायिक करा
लेवीय 16 वाचा