YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशवा 15

15
यहूदाला देण्यात आलेला प्रदेश
1यहूदा वंशाला त्याच्या कुळांप्रमाणे चिठ्ठ्या टाकून जो भाग मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणेकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सरहद्दीपर्यंत पसरला होता.
2त्यांच्या दक्षिण सीमेस क्षार समुद्राच्या दक्षिणेकडील खाडीपासून आरंभ झाला;
3ती तशीच अक्रब्बीम नावाच्या चढणीच्या दक्षिणेकडे निघून सीन रानाच्या कडेने कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस गेली असून हेस्रोनाजवळून अद्दारावरून जाऊन कर्काकडे वळली आहे;
4तेथून ती सीमा असमोनास जाऊन मिसरच्या नाल्यापर्यंत निघाली आहे; तिचा शेवट समुद्रानजीक झाला आहे; तुमची दक्षिण सीमा हीच.
5त्यांची पूर्व सीमा यार्देनेच्या मुखापर्यंतच्या क्षार समुद्राच्या किनार्‍यापर्यंत ठरली आहे. आणि उत्तर सीमा यार्देनेच्या मुखाजवळील समुद्राच्या खाडीपासून सुरू होऊन, 6बेथ-होग्लाच्या चढावावरून जाऊन बेथ-अराबाच्या उत्तरेकडे रऊबेनी बोहनच्या खडकापर्यंत गेली आहे;
7तेथून ती सीमा आखोर खोर्‍यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालाकडे वळली आहे; हे गिलगाल अदुम्मीमाच्या चढावासमोर नदीच्या दक्षिणेस आहे. मग ती सीमा एन-शेमेश नावाच्या झर्‍याजवळून जाऊन तिचा शेवट एन-रोगेलास होतो.
8तेथून ती सीमा हिन्नोमपुत्राच्या खोर्‍यातून यबूसी चढणीच्या दक्षिण भागावर म्हणजे यरुशलेमेच्या चढणीवरून पश्‍चिमेकडे हिन्नोमाच्या खोर्‍यासमोर आणि रेफाईम खोर्‍याच्या उत्तर टोकास असलेल्या पहाडाच्या माथ्यावर गेली आहे;
9तेथून ती सीमा त्या पहाडाच्या माथ्यापासून नफ्तोहाच्या झर्‍यापर्यंत जाते व एफ्रोन डोंगरातील नगरांवरून निघून तेथून बाला उर्फ किर्याथ-यारीम येथपर्यंत पोहचते.
10तेथून ती सीमा बालापासून पश्‍चिमेस वळसा घेऊन सेईर डोंगरास पोचून यारीम उर्फ कसालोन डोंगराच्या उत्तर बाजूस जाऊन बेथ-शेमेश येथे उतरते व तशीच तिम्नाकडे निघते;
11तेथून ती सीमा एक्रोनच्या उत्तर भागावरून शिक्रोनपर्यंत गेली आहे आणि बाला पहाडावरून यबनेलास निघाली आहे; ह्या सीमेचा शेवट समुद्रतीरी होतो.
12पश्‍चिमेची सरहद्द महासमुद्राचा किनारा होय. यहूदा वंशाला त्यांच्या कुळांप्रमाणे जो विभाग मिळाला त्याच्या ह्या चतु:सीमा होत.
कालेब हा हेब्रोन व दबीर ही नगरे हस्तगत करतो
(शास्ते 1:10-15)
13परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला यहोशवाने यहूदाच्या वंशजांबरोबर वतन दिले तेच किर्याथ-आर्बा उर्फ हेब्रोन होय; हा अर्बा अनाक्यांचा मूळ पुरुष.
14कालेबाने शेशय, अहीमान व तलमय ह्या अनाकाच्या तीन वंशजांना तेथून घालवून दिले.
15तेथून त्याने दबीराच्या रहिवाशांवर हल्ला केला; दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते.
16कालेब म्हणाला, “जो कोणी लढून किर्याथ-सेफर काबीज करील त्याला मी आपली मुलगी अखसा देईन.”
17तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याने ते नगर घेतले; म्हणून कालेबाने आपली मुलगी अखसा त्याला दिली.
18ती आली तेव्हा आपल्या बापापासून काही मागून घेण्यासाठी तिने त्याला चिथावले. ती गाढवावरून उतरली1 तेव्हा कालेबाने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?”
19ती म्हणाली, “मला एक देणगी द्या; तुम्ही मला नेगेब दिले आहे, तेव्हा मला पाण्याचे झरेही द्या;” तेव्हा त्याने वरचे झरे आणि खालचे झरे तिला दिले.
यहूदाला मिळालेली नगरे
20यहूदाच्या संतानाच्या वंशांतील कुळांप्रमाणे त्यांचे वतन हे :
21यहूदाच्या संतानाच्या वंशाला दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील ही नगरे मिळाली : कबसेल, एदेर व यागूर;
22कीना, दीमोना व अदादा;
23केदेश, हासोर व इथनान;
24जीफ, टेलेम व बालोथ;
25हासोरहदत्ता व करीयोथ-हेस्रोन (हेच हासोर);
26अमाम, शमा व मोलादा;
27हसरगदा, हेष्मोन व बेथ-पेलेट;
28हसरशुवाल, बैर-शेबा व बिजोथा;
29बाला, ईयीम व असेम;
30एल्तोलाद, कसील व हर्मा;
31सिकलाग, मद्मन्ना व सन्सन्ना;
32लबावोथ, शिलहीम, अईन व रिम्मोन. अशी एकंदर एकोणतीस नगरे व त्यांखालील खेडी मिळाली.
33तळवटीतील नगरे ही : एष्टावोल, सरा व अषणा;
34जानोह, एनगन्नीम, तप्पूहा व एनाम;
35यर्मूथ, अदुल्लाम, सोखो व अजेका;
36शाराईम, अदीथईम, गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे व त्यांखालील खेडी :
37सनान व दहाशा व मिग्दल-गाद;
38दिलान, मिस्पे व यकथेल;
39लाखीश, बसकाथ व एग्लोन;
40कब्बोन, लहमाम व किथलीश;
41गदेरोथ, बेथ-दागोन, नामा व मक्केदा, अशी सोळा नगरे व त्यांखालील खेडी.
42लिब्ना, एथेर व आशान;
43इफ्ताह, अषणा व नसीब;
44कईला, अकजीब व मारेशा; अशी नऊ नगरे व त्यांखालील खेडी.
45एक्रोन, त्याची उपनगरे व खेडी,
46एक्रोनाजवळची व पश्‍चिमेची अश्दोदाच्या बाजू-कडली सर्व नगरे व त्यांखालील खेडी.
47अश्दोद, त्याची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याची उपनगरे व खेडी; मिसरचा नाला व महासमुद्राच्या तीरावरली नगरे.
48आणि डोंगरवटीतली नगरे ही : शामीर, यत्तीर व सोखो;
49दन्ना किर्याथ-सन्ना (हेच दबीर);
50अनाब, एष्टमो व अनीम;
51गोशेन, होलोन व गिलो, अशी अकरा नगरे व त्यांखालील खेडी.
52अराब, दूमा व एशान;
53यानीम बेथ-तप्पूहा व अफेका;
54हुमटा, किर्याथ-अर्बा (हेच हेब्रोन) व सियोर; अशी नऊ नगरे व त्यांखालील खेडी.
55मावोन, कर्मेल, जीफ व यूटा;
56इज्रेल, यकदाम व जानोह;
57काइन, गिबा व तिम्ना; अशी दहा नगरे व त्यांखालील खेडी.
58हल्हूल, बेथ-सूर, गदोर;
59माराथ, बेथ-अनोथ व एल्तकोन; अशी सहा नगरे व त्यांखालील खेडी.
60किर्याथ-बाल (हेच किर्याम-यारीम) व राब्बा; ही दोन नगरे व त्यांखालील खेडी.
61रानातली नगरे ही : बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा;
62निबशान, क्षारनगर व एन-गेदी; अशी सहा नगरे व त्यांखालील खेडी.
63यरुशलेमेत राहणार्‍या यबूसी लोकांना घालवून देणे यहूदाच्या वंशजांना शक्य झाले नाही म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरुशलेमेत यहूदाच्या वंशजांबरोबर राहत आहेत.

सध्या निवडलेले:

यहोशवा 15: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन