YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 26

26
ईयोब देवाच्या सार्वभौमत्वाचे प्रतिपादन करतो
1मग ईयोबाने प्रत्युत्तर केले,
2“तू निर्बळास केवढेसे साहाय्य केले? शक्तिहीन बाहूला तू कितीसा आधार दिलास?
3बुद्धिहीनास कशी काय मसलत दिली? तू कितीसे मोठे ज्ञान प्रकट केलेस?
4तू कोणापुढे हे शब्द बोललास? कोणाचे मनोगत तुझ्या तोंडून निघाले?
5मृतांचे आत्मे जलनिधीच्या व जलचरांच्या खाली थरथरा कापत आहेत.
6देवापुढे अधोलोक उघडा आहे; विनाशस्थान1 आच्छादित नाही.
7त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शून्य अवकाशावर पसरले आहे; त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे.
8तो पाणी मेघमंडळात कोंडून ठेवतो; मेघ त्याच्या भाराने भंग पावत नाहीत.
9तो आपल्या सिंहासनापुढे आपले मेघ पसरून ते झाकून टाकतो;
10प्रकाश व अंधकार ह्यांमधील हद्दीशी त्याने जलनिधीची सीमा भिडवली आहे.
11त्याच्या धाकाने गगनस्तंभ थरथर कापतात व भयचकित होतात.
12तो आपल्या सामर्थ्याने समुद्र शमवतो;2 तो आपल्या बुद्धिबलाने राहाब छिन्नभिन्न करतो;
13त्याच्या नि:श्वासाने आकाशाची शोभा प्रकट होते; त्याच्या हाताने धावता राक्षसी सर्प विंधला आहे;
14पाहा, ह्या त्याच्या कार्यक्षेत्राच्या केवळ सीमा आहेत; त्याची केवळ चाहूल आपल्या कानी येते; पण त्याच्या प्रभावाच्या गर्जनेचा अंत कोणाला लागेल?”

सध्या निवडलेले:

ईयोब 26: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन