मग ईयोबाने प्रत्युत्तर केले, “अजूनही माझे गार्हाणे हटवादाचे आहे; त्याचा प्रहार माझ्या विलापाहून भारी आहे. देव कोठे सापडेल हे मला समजले असते, मी त्याच्या न्यायासनाजवळ जाऊन पोहचलो असतो, तर किती बरे होते! मग माझी फिर्याद मी त्याच्यापुढे मांडली असती; माझ्या तोंडून भरपूर मुद्दे निघाले असते. तो मला काय उत्तर देतो ते मला समजले असते; तो मला काय म्हणाला असता ते मी लक्षात घेतले असते. त्याने आपले मोठे बल खर्चून बरोबर वाद केला असता काय? नाही; तर त्याने माझी दाद घेतली असती. त्याच्याशी वाद करणारा न्यायी ठरला असता; म्हणजे मी एकदाचा माझ्या न्यायाधीशाच्या हातून सुटलो असतो; पाहा, मी पुढे गेलो तरी तो सापडत नाही, मागे गेलो तरी तो तेथे दिसत नाही. डाव्या बाजूस, जेथे तो आपली कृती करतो तिकडे, त्याला मी पाहतो, तरी तो मला दिसत नाही; मी उजवीकडे वळतो, तिकडेही तो मला दिसत नाही; परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे; त्याने मला पारखून पाहिले म्हणजे मी सोन्यासारखा निघेन. त्याच्या पावलावर माझे पाऊल पडत आले आहे; मी त्याचा मार्ग धरून आहे; त्यापासून मी भ्रष्ट झालो नाही. त्याच्या तोंडची आज्ञा पाळण्यास मी माघार घेतली नाही; माझ्या स्वतःच्या मनोरथापलीकडे2 मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवली आहेत. तो न बदलणारा आहे, त्याला त्यापासून कोण फिरवणार? आपल्या मनास येते ते तो करतो; जे मला नेमले आहे ते तो घडवून आणत आहे; अशा पुष्कळ गोष्टी त्याच्याजवळ आहेत; म्हणून त्याच्यासमोर मी घाबरा होतो मी ह्याचा विचार करतो तेव्हा मला त्याची भीती वाटते. देवाने माझे मन उदास केले आहे; सर्वसमर्थाने मला हैराण केले आहे. अंधकारामुळे मला दहशत वाटली असे नाही. घोर अंधकाराने माझे मुख झाकले म्हणून मला भय वाटते असे नाही
ईयोब 23 वाचा
ऐका ईयोब 23
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 23:1-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ