ईयोब 18
18
दुष्टाच्या अंताचे बिल्दद वर्णन करतो
1मग बिल्दद शूही म्हणाला,
2“तुम्ही कोठवर शब्द शोधून योजत बसाल? तुम्ही समज घ्या, मग आम्ही बोलू.
3तुमच्या हिशोबी आम्ही पशू का ठरलो? तुमच्या दृष्टीने आम्ही अशुद्ध का झालो?
4अरे क्रोधाने स्वतःस फाडून टाकणार्या, तुझ्यामुळे पृथ्वी ओस पडेल काय? खडक आपल्या ठिकाणचा ढळेल काय?
5तरी दुष्टाचा दीप मालवेल, त्याच्या अग्नीची ज्वाला झळकणार नाही.
6त्याच्या डेर्यातला प्रकाशाचा अंधकार होईल, त्याचा लामणदिवा विझून जाईल.
7त्याच्या जोराच्या ढांगा संकोच पावतील, त्याचीच युक्ती त्याचा निःपात करील.
8तो आपल्या पायांनी जाळ्यात अडकतो, तो पाशात पाऊल टाकत आहे.
9त्याची टाच सापळ्यात अडकते; पाश त्याला धरून ठेवतो.
10त्याच्यासाठी पाश जमिनीत गुप्त ठेवला आहे; त्याच्या मार्गात सापळा ठेवला आहे.
11त्याला दहशत चोहोकडून घाबरे करते; ती त्याचा पिच्छा पुरवते.
12त्याची शक्ती क्षुधिताप्रमाणे क्षीण होईल; तो केव्हा पडेल ह्याची अरिष्ट वाट पाहत आहे.
13ते त्याच्या शरीराचे अवयव तोडून खाईल; मृत्यूचा ज्येष्ठ पुत्र त्याचे अवयव ग्रासील.
14ज्या डेर्याचा तो भरवसा धरी त्यातून त्याला ओढून काढतील; त्याला भयाच्या राजापुढे हजर करतील.
15जे त्याचे नव्हत ते त्याच्या डेर्यात वास करतील त्याच्या वसतिस्थानांवर गंधक उधळतील.
16खालून त्याचे मूळ सुकेल, व वरून त्याची डाहळी छाटतील.
17देशातून त्याची आठवण बुजेल, व पेठेत त्याचे नाव राहणार नाही.
18ते त्याला प्रकाशातून अंधकारात लोटतील, त्याला जगातून पळवतील.
19त्याच्या लोकांत त्याचे कोणी पुत्रपौत्र आढळणार नाहीत; त्याच्या बिर्हाडात कोणी उरणार नाही.
20त्याचा दुर्दिन पाहून पश्चिमेकडे राहणारे चकित होतील, पूर्वेकडे राहणारे कंपित होतील.
21कुटिलाच्या निवासांचे निःसंशय असेच होणार; देवाला न ओळखणार्याच्या स्थानाचे असेच होणार.”
सध्या निवडलेले:
ईयोब 18: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.