YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 17

17
1“माझा प्राणनाश होत आहे. माझे दिवस संपले आहेत; मला कबर काय ती राहिली आहे.
2लोकांच्या विटंबनेने मला घेरले आहे; त्यांचे खिजवणे माझ्या नेत्रांसमोर सतत चालू आहे.
3आता हडप दे, तुझ्यामाझ्यामध्ये तूच माझा जामीन हो; माझ्या हातावर हात मारील असा दुसरा कोण आहे?
4तू त्यांच्या मनात अकलेचा प्रवेश होऊ दिला नाहीस; म्हणून तू त्यांचे वर्चस्व होऊ देणार नाहीस.
5जो आपल्या मित्रांशी दगा करून त्यांना लुटीप्रमाणे परक्यांच्या हाती देतो, त्याच्या मुलाबाळांचे डोळे जातील.
6त्याने माझे नाव लोकात निंदाव्यंजक केले आहे; लोक माझ्या तोंडावर थुंकत आहेत.
7माझे डोळे दुःखाने अंधुक झाले आहेत; माझे सर्व अवयव छायारूप झाले आहेत.
8हे पाहून सरळ मनाचे लोक चकित होतील; निर्दोष जन भक्तिहीनामुळे क्रुद्ध होतील;
9तरी नीतिमान आपला मार्ग धरून राहील, निर्मळ हाताच्या मनुष्याला अधिकाधिक शक्ती प्राप्त होईल;
10पण तुम्ही सर्व पुन्हा वादास या; तुमच्यामध्ये मला एकही सुज्ञ आढळायचा नाही.
11माझे दिवस आटोपले आहेत; माझे मनोरथ, माझ्या मनातले विचार, निष्फळ झाले आहेत.
12ते रात्रीला दिवस ठरवतात; ‘अंधकारापेक्षा प्रकाश जवळ आहे’ असे ते म्हणतात.
13जर अधोलोक माझे निजधाम आहे, एवढीच मला आशा आहे. जर मी आपली शय्या अंधकारात केली आहे,
14जर मी गर्तेस म्हणालो, ‘तू माझा बाप;’ किडीला म्हणालो आहे ‘तू माझी आईबहीण;’
15तर आता मला आशा राहिली आहे कोठे? माझ्या आशेविषयी म्हणाल तर ती कोणाला दिसेल?
16ती अधोलोकाच्या अडसरांपर्यंत उतरेल, तेव्हा मातीत एकदाचा आम्हांला विराम मिळेल.”

सध्या निवडलेले:

ईयोब 17: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन