YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 8:1-3

यिर्मया 8:1-3 MARVBSI

परमेश्वर म्हणतो, त्या काळात यहूदाच्या राजांच्या अस्थी, त्यांच्या सरदारांच्या अस्थी, याजकांच्या अस्थी, संदेष्ट्यांच्या अस्थी व यरुशलेमकरांच्या अस्थी त्यांच्या कबरांतून बाहेर काढतील. त्या ते सूर्य, चंद्र व आकाशातील सर्व नक्षत्रगण ह्यांपुढे पसरतील; त्यांची तर त्यांनी आवड धरली, त्यांची सेवा केली, त्यांच्यामागे ते चालले, त्यांचा त्यांनी धावा केला व त्यांचे भजनपूजन केले; त्या अस्थी गोळा करून पुरणार नाहीत, तर त्या भूतलावर खत होतील. ह्या दुष्ट वंशाचे अवशिष्ट राहिलेले ज्या ज्या स्थळी मी हाकून लावले त्या त्या स्थळी जे बाकी उरतील ते जीवनाऐवजी मरण पसंत करतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.