YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 41

41
1सातव्या महिन्यात असे झाले की इश्माएल बिन नथन्या बिन अलीशामा, जो राजवंशातला असून राजाच्या मुख्य अंमलदारांपैकी होता तो व त्याच्याबरोबर दहा माणसे ही गदल्या बिन अहीकाम ह्याच्याकडे मिस्पा येथे आली; मिस्पा येथे ते एका पंक्तीला बसून जेवले.
2त्या प्रसंगी इश्माएल बिन नथन्या व त्याच्याबरोबरची दहा माणसे ह्यांनी उठून गदल्या बिन अहीकाम बिन शाफान, ज्याला बाबेलच्या राजाने देशावर अधिपती म्हणून नेमले होते, त्याला तलवारीने ठार मारले.
3त्याप्रमाणेच मिस्पा येथे गदल्याजवळ जे सर्व यहूदी होते त्यांना व तेथे असलेले खास्दी योद्धे ह्यांनाही इश्माएलाने जिवे मारले.
4त्याने गदल्याचा वध केला ही गोष्ट बाहेर फुटण्यापूर्वी दुसर्‍या दिवशी असे झाले की,
5शखेम, शिलो व शोमरोन येथून ऐंशी माणसे आली; त्यांच्या दाढ्या मुंडलेल्या, त्यांची वस्त्रे फाडलेली, त्यांच्या अंगास घाय झालेले, व परमेश्वराच्या मंदिरात अर्पण करण्यासाठी हाती अन्नार्पणे व ऊद असलेली अशी ती आली.
6इश्माएल बिन नथन्या हा मिस्पा येथून त्यांना सामोरा गेला; तो वाटेने रडत गेला. त्यांची भेट झाल्यावर तो त्यांना म्हणाला, “गदल्या बिन अहीकाम ह्याच्याकडे चला.”
7ते शहराच्या मध्यभागी आल्यावर असे झाले की इश्माएल बिन नथन्या ह्याने व त्याच्या साथीदारांनी त्यांना जिवे मारून विहिरीत फेकून दिले.
8पण त्यांपैकी दहा जण इश्माएलास म्हणाले की, ‘आम्हांला मारून टाकू नकोस; कारण आमच्याजवळ शेतात लपवून ठेवलेला गहू, जव, तेल व मध ह्यांचा साठा आहे.’ तेव्हा त्याने त्यांना सोडून दिले, त्यांच्या बांधवांबरोबर त्यांना मारले नाही.
9इश्माएलाने पूर्वी ज्यांना मारले होते त्यांची प्रेते त्याने गदल्याच्या बाजूला एका विहिरीत टाकली होती; ही विहीर आसा राजाने इस्राएलाचा राजा बाशा ह्याच्या भीतीने खणली होती. ही विहीर इश्माएल बिन नथन्या ह्याने प्रेतांनी भरून काढली.
10तेव्हा इश्माएलाने मिस्पा येथे असलेले सर्व अवशिष्ट लोक पकडून नेले; राजकन्यांना व मिस्पा येथे राहिलेल्या सर्व लोकांना गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने गदल्या बिन अहीकाम ह्याच्या स्वाधीन केले होते त्यांना नेले; इश्माएल बिन नथन्या ह्याने त्यांना बंदिवान करून नेले व तो अम्मोनी लोकांकडे जाण्यास निघाला.
11मग योहानान बिन कारेह व त्याच्याबरोबर असलेले सैन्याचे सर्व नायक ह्यांनी इश्माएल बिन नथन्या ह्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांची बातमी ऐकली.
12तेव्हा ते सर्व माणसे बरोबर घेऊन इश्माएल बिन नथन्या ह्याच्याशी लढण्यास गेले; त्यांनी गिबोनाजवळ मोठा तलाव आहे तेथे त्यांना गाठले.
13तेव्हा असे झाले की, इश्माएलाबरोबर असलेल्या सर्व लोकांनी योहानान बिन कारेह व त्याच्याबरोबर सैन्याचे जे सर्व नायक ह्यांना पाहिले तेव्हा त्यांना आनंद झाला.
14जे सर्व लोक इश्माएलाने मिस्पा येथून पकडून नेले होते, ते उलटून योहानान बिन कारेह ह्याच्याकडे गेले;
15पण इश्माएल बिन नथन्या आठ माणसांसह योहानानापासून निसटून अम्मोनी लोकांकडे गेला.
16मग गदल्या बिन अहीकाम ह्याला मारल्यावर इश्माएल बिन नथन्या ह्याने जे योद्धे, स्त्रिया, मुले व खोजे ह्यांना धरून मिस्पा येथून नेले होते. त्यांना योहानान बिन कारेह व त्याच्याबरोबर असलेले सैन्याचे सर्व नायक ह्यांनी मिस्पा येथे त्यांच्या हातून सोडवून गिबोनाहून परत आणले त्या सर्व अवशिष्ट लोकांना घेऊन,
17ते मिसर देशास जाण्याच्या हेतूने बेथलेहेमनजीक गेरूथ-किम्हाम येथे जाऊन राहिले;
18त्यांना खास्द्यांचे भय होते, कारण बाबेलच्या राजाने ज्या गदल्या बिन अहीकाम ह्याला देशाचा अधिपती नेमले होते त्याला इश्माएल बिन नथन्या ह्याने जिवे मारले होते.

सध्या निवडलेले:

यिर्मया 41: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन