यहोयाकीमाचा पुत्र कोन्या1 ह्याच्या जागी योशीयाचा पुत्र सिद्कीया राज्य करू लागला; ह्याला बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने यहूदा देशावर राजा केले होते. परंतु त्याने, त्याच्या सेवकांनी व देशाच्या लोकांनी, यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे जी वचने परमेश्वराने सांगितली होती ती ऐकली नाहीत. तेव्हा सिद्कीया राजाने शलेम्याचा पुत्र यहूकल व मासेयाचा पुत्र सफन्या याजक ह्यांना यिर्मया संदेष्ट्याकडे सांगून पाठवले की, “आमच्यासाठी आमचा देव परमेश्वर ह्याच्याकडे प्रार्थना कर.” त्या वेळी यिर्मयाचे लोकांत जाणेयेणे होते, कारण त्याला अद्यापि बंदिशाळेत टाकले नव्हते. त्या समयी मिसर देशातून फारोचे सैन्य आले; ही वार्ता ऐकून यरुशलेमेस वेढा घालणारे खास्दी यरुशलेम सोडून गेले. तेव्हा परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्ट्याला प्राप्त झाले ते असे : “परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, यहूदाच्या राजाने तुम्हांला माझ्याकडे विचारण्यास पाठवले आहे, तर त्याला सांगा, पाहा, फारोचे सैन्य तुमची कुमक करण्यास आले आहे ते मिसरास स्वदेशी परत जाईल. खास्दी लोक परत येऊन ह्या नगराशी लढतील व ते घेऊन अग्नीने जाळतील. परमेश्वर म्हणतो, ‘खास्दी लोक आम्हांला खरोखर सोडून जातील’, असे म्हणून आपली फसवणूक करून घेऊ नका; ते निघून जाणार नाहीत. कारण तुमच्याबरोबर लढणार्या खास्द्यांच्या अवघ्या सैन्याचा जरी तुम्ही पराभव केला व त्यांच्यातले अगदी घायाळ झालेले मात्र काही उरले तरी ते सर्व आपापल्या तंबूत उठून उभे राहतील व हे नगर अग्नीने जाळतील.”
यिर्मया 37 वाचा
ऐका यिर्मया 37
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यिर्मया 37:1-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ