यिर्मया 37:1-10
यिर्मया 37:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
यहोयाकीमाचा पुत्र कोन्या1 ह्याच्या जागी योशीयाचा पुत्र सिद्कीया राज्य करू लागला; ह्याला बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने यहूदा देशावर राजा केले होते. परंतु त्याने, त्याच्या सेवकांनी व देशाच्या लोकांनी, यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे जी वचने परमेश्वराने सांगितली होती ती ऐकली नाहीत. तेव्हा सिद्कीया राजाने शलेम्याचा पुत्र यहूकल व मासेयाचा पुत्र सफन्या याजक ह्यांना यिर्मया संदेष्ट्याकडे सांगून पाठवले की, “आमच्यासाठी आमचा देव परमेश्वर ह्याच्याकडे प्रार्थना कर.” त्या वेळी यिर्मयाचे लोकांत जाणेयेणे होते, कारण त्याला अद्यापि बंदिशाळेत टाकले नव्हते. त्या समयी मिसर देशातून फारोचे सैन्य आले; ही वार्ता ऐकून यरुशलेमेस वेढा घालणारे खास्दी यरुशलेम सोडून गेले. तेव्हा परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्ट्याला प्राप्त झाले ते असे : “परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, यहूदाच्या राजाने तुम्हांला माझ्याकडे विचारण्यास पाठवले आहे, तर त्याला सांगा, पाहा, फारोचे सैन्य तुमची कुमक करण्यास आले आहे ते मिसरास स्वदेशी परत जाईल. खास्दी लोक परत येऊन ह्या नगराशी लढतील व ते घेऊन अग्नीने जाळतील. परमेश्वर म्हणतो, ‘खास्दी लोक आम्हांला खरोखर सोडून जातील’, असे म्हणून आपली फसवणूक करून घेऊ नका; ते निघून जाणार नाहीत. कारण तुमच्याबरोबर लढणार्या खास्द्यांच्या अवघ्या सैन्याचा जरी तुम्ही पराभव केला व त्यांच्यातले अगदी घायाळ झालेले मात्र काही उरले तरी ते सर्व आपापल्या तंबूत उठून उभे राहतील व हे नगर अग्नीने जाळतील.”
यिर्मया 37:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता यहोयाकीमचा मुलगा कोन्या याच्याऐवजी, योशीयाचा मुलगा सिद्कीया हा राजा म्हणून राज्य करीत होता. बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने, सिद्कीयाला यहूदा देशावर राजा केले होते. पण सिद्कीया, त्याच्या सेवकांनी व यहूदा देशाच्या लोकांनी परमेश्वराने यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जी वचने सांगितली होती ती त्यांनी ऐकली नाहीत. म्हणून राजा सिद्कीयाने शलेम्याचा मुलगा यहूकल व मासेया याजकाचा मुलगा सफन्या ह्यांना पाठवून यिर्मया संदेष्ट्याकडे निरोप सांगितला. ते म्हणाले, “तू, आमच्यावतीने परमेश्वर आमचा देव याच्याजवळ प्रार्थना कर.” आता यिर्मया लोकांमध्ये येत व जात होता, कारण आतापर्यंत त्यास बंदिशाळेत टाकले नव्हते. मिसरातून फारोचे सैन्य बाहेर आले आणि ज्या खास्द्यांनी यरूशलेमला वेढा घातला होता त्यांनी हे वर्तमान ऐकले आणि यरूशलेम सोडून गेले. नंतर यिर्मया संदेष्ट्याकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले, “परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, तुम्ही यहूदाच्या राजाला हे सांगा, कारण माझ्यापासून सल्ला घेण्यासाठी तुम्हास माझ्याकडे पाठविले आहे, पाहा, फारोचे सैन्य, तुम्हास मदत करण्यासाठी आले, त्यांना स्वतःच्या मिसर देशात परत जावे लागेल. खास्दी परत येतील. ते या नगराविरूद्ध लढतील, ते जिंकून जाळतील. परमेश्वर असे म्हणतो, खास्दी आम्हापासून निघून जातील असे म्हणून स्वत:ची फसवणूक करून घेऊ नका. कारण ते निघून जाणार नाहीत. जरी तुम्हाशी लढणाऱ्या संपूर्ण खास्दी सैन्यावर तुम्ही हल्ला केला, फक्त जखमी माणसे त्यांच्या तंबूत उरले, तरीसुद्धा ते उठून हे शहर जाळतील.”
यिर्मया 37:1-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहोयाकीमचा पुत्र कोन्याह याची यहूदीयाचा नवा राजा म्हणून नेमणूक केली नाही. त्याऐवजी त्याने योशीयाहचा पुत्र सिद्कीयाह याची निवड केली. याहवेह यिर्मयाह संदेष्ट्याद्वारे जी वचने सांगत होते, त्याकडे सिद्कीयाह राजा, त्याचे सेवेकरी व देशातील लोक यापैकी कोणीही लक्ष दिले नाही. तरीपण सिद्कीयाह राजाने शेलेम्याहचा पुत्र यहूकल व मासेयाहचा पुत्र सफन्याह याजक यांना यिर्मयाह संदेष्ट्याकडे अशी विनंती करण्यास पाठविले: “तू आमच्यासाठी आमचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे प्रार्थना कर.” यावेळी यिर्मयाह अद्यापही बंदिवासात टाकला गेला नव्हता, त्यामुळे तो आपल्या इच्छेप्रमाणे लोकांमध्ये जाणे-येणे करू शकत असे. इजिप्तच्या फारोहच्या सैन्याने इजिप्तमधून कूच केले आहे, ही बातमी जेव्हा बाबेल्यांनी ऐकली, तेव्हा त्यांनी यरुशलेमच्या वेढ्यापासून माघार घेतली. त्यावेळी यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहचे हे वचन आले: “इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: यहूदीयाच्या राजाने माझा संदेश विचारण्यासाठी तुला पाठविले आहे, तर त्याला सांग, ‘फारोहचे सैन्य इजिप्तमधून तुमच्या साहाय्यासाठी आले असले, तरी ते इजिप्तला परत जातील. बाबिलोनचे सैन्य माघारी येतील, हे शहर हस्तगत करून ते जाळून जमीनदोस्त करतील.’ “याहवेह असे म्हणतात: ‘बाबिलोनचे सैन्याने आपल्याला निश्चितच सोडणार आहेत.’ असा गैरसमज करून घेऊ नका. ते सोडून जाणार नाहीत! तू बाबेलच्या सैन्याचा पराभव केलास, व त्यांच्यातील घायाळ झालेले सैनिकच त्यांच्या तंबूत उरले, तरी ते बाहेर येतील व हे शहर पेटवून देतील!”