YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 23:33-40

यिर्मया 23:33-40 MARVBSI

जेव्हा हे लोक किंवा एखादा संदेष्टा किंवा याजक तुला विचारील की, ‘परमेश्वराचे भारी वचन काय आहे?’ तेव्हा त्यांना म्हण, ‘तुम्ही भारी आहात आणि मीच तुम्हांला टाकून देईन,’ असे परमेश्वर म्हणतो. कोणी संदेष्टा, याजक किंवा लोकांतला कोणी, ‘परमेश्वराचे भारी वचन’, हे शब्द उच्चारील तर मी त्या माणसाला व त्याच्या घराण्याला शिक्षा करीन. तर तुमच्यापैकी एकाने आपल्या शेजार्‍याला व आपल्या बांधवाला म्हणावे, ‘परमेश्वराने काय उत्तर दिले? परमेश्वर काय बोलला?’ तुम्ही ह्यापुढे, ‘परमेश्वराचे भारी वचन,’ असे म्हणू नये, कारण प्रत्येकाचे वचन त्याला स्वतःला भारी आहे; तुम्ही तर जिवंत देवाची, सेनाधीश परमेश्वर आमचा देव ह्याची वचने विपरीत केली आहेत. तू संदेष्ट्याला विचार की, ‘परमेश्वराने तुला काय उत्तर दिले? परमेश्वर काय बोलला?’ तरीपण ‘परमेश्वराचे भारी वचन’ असेच तुम्ही बोलत राहाल, तर परमेश्वर म्हणतो, ज्या अर्थी तुम्ही ‘परमेश्वराचे भारी वचन’ हे शब्द बोलत राहता व तुम्ही ‘परमेश्वराचे भारी वचन’, हे शब्द बोलू नका म्हणून मी तुम्हांला सांगून पाठवले, त्या अर्थी पाहा, मी तुम्हांला अगदी विसरेन, मी तुम्हांला आणि जे नगर तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिले त्याला माझ्या नजरेसमोरून झुगारून देईन; आणि तुम्हांला सर्वकाळचा कलंक लावीन; जिचा कधी विसर पडणार नाही अशी तुमची सतत अप्रतिष्ठा करीन.”