त्याच रात्री परमेश्वर त्याला म्हणाला, “ऊठ, खाली उतर, त्या छावणीवर चाल कर, कारण ती मी तुझ्या हाती दिली आहे. तुला खाली उतरायला भीती वाटत असली तर आपला सेवक पुरा ह्याला बरोबर घेऊन छावणीकडे जा. आणि ते काय बोलत असतील ते ऐक, म्हणजे तुला त्या छावणीवर चाल करायला हिंमत येईल.” मग तो आपला सेवक पुरा ह्याला बरोबर घेऊन छावणीच्या सीमेवर एका टोकाला हत्यारबंद संत्री होते त्यांच्याजवळ गेला. त्या खोर्यात मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे लोक टोळधाडीप्रमाणे पसरले होते. त्यांचे उंट समुद्रकिनार्यावरील वाळूप्रमाणे अगणित होते. गिदोन तेथे गेला तेव्हा एक जण आपल्या सोबत्याला आपले स्वप्न सांगत होता; तो म्हणाला, “ऐक, मी स्वप्नात पाहिले की, सातूची एक भाकर घरंगळत मिद्यानाच्या छावणीत येऊन पडली. तिने डेर्याला असा धक्का दिला की तो पडला; तो उलटून पडला व भुईसपाट झाला.” त्याच्या सोबत्याने उत्तर दिले, “योवाशाचा मुलगा गिदोन ह्या इस्राएली पुरुषाची ही तलवार होय, दुसरे काही नव्हे; त्याच्या हाती देवाने मिद्यान व त्याचे सर्व सैन्य दिले आहे.” ते स्वप्न व त्याचा अर्थ ऐकून गिदोनाने दंडवत घातले; मग तो इस्राएलाच्या छावणीत परत येऊन म्हणाला, “ऊठा, कारण परमेश्वराने मिद्यानाचे सैन्य तुमच्या हाती दिले आहे.” त्याने त्या तीनशे लोकांच्या तीन तुकड्या केल्या; त्या सर्वांच्या हातांत त्याने रणशिंगे व रिकामे घडे दिले; त्या घड्यांच्या आत दिवट्या ठेवल्या. तो त्यांना म्हणाला, “माझ्याकडे पाहा, आणि मी करतो तसे करा; छावणीच्या सीमेवरील टोकावर मी पोहचलो म्हणजे मी करीन तसे करा.
शास्ते 7 वाचा
ऐका शास्ते 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: शास्ते 7:9-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ