त्याने त्या तीनशे लोकांच्या तीन तुकड्या केल्या; त्या सर्वांच्या हातांत त्याने रणशिंगे व रिकामे घडे दिले; त्या घड्यांच्या आत दिवट्या ठेवल्या. तो त्यांना म्हणाला, “माझ्याकडे पाहा, आणि मी करतो तसे करा; छावणीच्या सीमेवरील टोकावर मी पोहचलो म्हणजे मी करीन तसे करा. मी व माझ्याबरोबरचे सर्व जण रणशिंगे फुंकू तेव्हा तुम्हीही छावणीच्या सभोवती रणशिंगे फुंका आणि म्हणा, ‘परमेश्वराचा जय, गिदोनाचा जय!”’ रात्रीच्या मधल्या प्रहराच्या आरंभी पहारा नुकताच बदलला तेव्हा गिदोन आपल्या शंभर पुरुषांसह छावणीच्या सीमेवरील टोकावर गेला; मग त्यांनी रणशिंगे फुंकून आपल्या हातांतील घडे फोडून टाकले. तेव्हा त्या तिन्ही तुकड्यांनी रणशिंगे फुंकून घडे फोडून टाकले आणि आपल्या डाव्या हातात दिवट्या आणि उजव्या हातात फुंकण्यासाठी रणशिंगे घेऊन परमेश्वराची तलवार, गिदोनाची तलवार असा घोष केला. तेव्हा छावणीच्या सभोवती प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी उभा राहिला व ती सर्व सेना पळू लागली; तिने ओरडत ओरडत पळ काढला. त्यांनी ती तीनशे रणशिंगे फुंकली तेव्हा परमेश्वराने प्रत्येक माणसाची तलवार त्याच्या सोबत्यांवर व सर्व सेनेवर चालवली; तेव्हा ती सेना सरेराजवळच्या बेथ-शिट्टापर्यंत व टब्बाथाजवळच्या आबेल-महोलाच्या सीमेपर्यंत पळून गेली. मग नफताली, आशेर व सर्व मनश्शे येथल्या इस्राएल लोकांना बोलावण्यात आले व त्यांनी मिद्यानाचा पाठलाग केला. गिदोनाने एफ्राइमाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात जासूद पाठवून लोकांना सांगितले की, “मिद्यान्यांना अडवायला या आणि बेथ-बारापर्यंत यार्देन नदीचे उतार रोखून धरा.” त्याप्रमाणे एफ्राइमाच्या सगळ्या लोकांना बोलावण्यात आले आणि त्यांनी बेथ-बारापर्यंतचे उतार रोखून धरले. त्यांनी मिद्यानाचे ओरेब व जेब ह्या नावांचे दोन सरदार पकडले; त्यांनी ओरेबाला ओरेबाच्या खडकावर जिवे मारले व जेबाला जेबाच्या द्राक्षकुंडाजवळ जिवे मारले आणि मिद्यानांचा पाठलाग केला; त्यांनी ओरेब व जेब ह्यांची मुंडकी यार्देनेपार गिदोनाकडे नेली.
शास्ते 7 वाचा
ऐका शास्ते 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: शास्ते 7:16-25
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ