तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवांत ज्या वासना लढाई करतात त्यांतून की नाही? तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हांला प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करता तरी हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही; तुम्ही भांडता व लढता; तुम्ही मागत नाही, म्हणून तुम्हांला प्राप्त होत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हांला मिळत नाही; कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरता खर्चावे म्हणून मागता. अहो अविश्वासू लोकांनो,1 जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.
याकोब 4 वाचा
ऐका याकोब 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: याकोब 4:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ