यहूदाचा राजा आहाज बिन योथाम बिन उज्जीया ह्याच्या दिवसांत असे झाले की अरामाचा राजा रसीन व इस्राएलाचा राजा पेकह बिन रमाल्या हे यरुशलेमेबरोबर लढण्यास चढाई करून गेले, परंतु त्यांची त्यावर काही सरशी झाली नाही. ‘अरामाची एफ्राइमाशी जूट झाली आहे’ असे दाविदाच्या घराण्याला कळवण्यात आले तेव्हा रानातील वृक्ष वार्याने कापतात तसे त्याचे मन व त्याच्या लोकांची मने कंपित झाली. तेव्हा परमेश्वर यशयाला म्हणाला, “तू आपला पुत्र शआर-याशूब (अवशेष परत येईल) ह्याला बरोबर घेऊन वरच्या तळ्याचा नळ जेथे संपतो तेथे परटाच्या शेताच्या वाटेवर आहाजाला भेटायला जा; आणि त्याला सांग की, ‘सावध हो व शांत राहा; भिऊ नकोस; ह्या दोन कोलितांच्या उरलेल्या धुमसणार्या शेपटांमुळे म्हणजे क्रोधाने भडकलेले अरामी रसीन व रमाल्याचा पुत्र ह्यांच्यामुळे तुझे मन खचू देऊ नकोस. अराम, एफ्राईम व रमाल्याचा पुत्र ह्यांनी तुझ्याविरुद्ध दुष्ट संकल्प केला आहे की, आपण यहूदावर चालून जाऊन त्यांना धाक घालू, तटबंदी फोडून तो घेऊ आणि ताबेलाच्या पुत्राची त्यामध्ये राजा म्हणून स्थापना करू. प्रभू परमेश्वर म्हणतो : हे सफळ व्हायचे नाही, हे घडायचे नाही. अरामाचे शीर दिमिष्क व दिमिष्काचे शीर रसीन. (पासष्ट वर्षे झाली नाहीत तोच एफ्राईम भंग पावेल व त्याचे राष्ट्रत्व राहणार नाही.) एफ्राइमाचे शीर शोमरोन व शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र. तुम्ही भाव ठेवणार नाही तर तुमचा निभाव लागणार नाही.”’ परमेश्वर आहाजास आणखी म्हणाला : “तुझा देव परमेश्वर ह्याच्याकडे तू आपणासाठी चिन्ह माग; ते खाली अधोलोकात असो किंवा वर उर्ध्वलोकात असो.” आहाज म्हणाला, “मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.”
यशया 7 वाचा
ऐका यशया 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशया 7:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ