YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 41:13-16

यशया 41:13-16 MARVBSI

कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, “भिऊ नकोस, मी तुला साहाय्य करतो.” हे कीटका, याकोबा, इस्राएलाचे लोकहो, भिऊ नका, असे परमेश्वर म्हणतो; मी तुला साहाय्य करतो; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे. पाहा, मी तुझे तीक्ष्ण, नवीन व दुधारी असे मळणीचे औत बनवत आहे; तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील व टेकड्यांचा भुसा करशील. तू त्यांना उफणशील, वारा त्यांना उडवून टाकील, वावटळ त्यांना उधळून देईल; आणि तू परमेश्वराच्या ठायी उल्लास पावशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा अभिमान धरशील.