अरे लुटार्या, तुला लुटले नाही; अरे ठका, तुला ठकवले नाही; तुला धिक्कार असो! तुझे लुटणे आटपले म्हणजे तुला लुटतील; तुझे ठकवणे आटपले म्हणजे तुला ठकवतील. हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर; आम्ही तुझी आशा धरून आहोत; रोज सकाळी तू आमचा भुज हो, आणि संकटसमयी आमचा उद्धारक हो. कलहाचा ध्वनी ऐकताच लोक पळून गेले; तू उभा राहताच राष्ट्रे पांगून गेली. टोळ जसे सारे फस्त करतात तशी तुमची लूट हरण करतील, नाकतोडे धाड घालतात तसे तिच्यावर धाड घालतील. परमेश्वर उन्नत झाला आहे, उच्च स्थानी राहून त्याने सीयोन न्यायशीलतेने व नीतिमत्तेने भरले आहे. तुझ्या काळी स्थिरता वसेल; तारण, सुज्ञता व ज्ञान ह्यांचे वैपुल्य होईल; परमेश्वराचे भय त्याचा निधी होईल.
यशया 33 वाचा
ऐका यशया 33
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशया 33:1-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ