YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 32:1-8

यशया 32:1-8 MARVBSI

पाहा, राजा धर्माने राज्य करील, त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवतील. वार्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल; रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल. तेव्हा पाहणार्‍यांचे डोळे मंद होणार नाहीत; ऐकणार्‍यांचे कान ऐकतील. उतावळ्यांच्या मनाला ज्ञानाचा उमज पडेल, तोतर्‍यांची जीभ अस्खलित व स्पष्ट बोलेल. मूर्खाला थोर व ठकास प्रतिष्ठित म्हणणार नाहीत. भ्रष्टाचार करावा, परमेश्वराविरुद्ध पाखंड सांगावे, भुकेला जीव भुकेला ठेवावा, तान्हेल्यास प्यायला काही मिळू देऊ नये म्हणून मूर्ख मूर्खतेचे भाषण करतो, त्याचे मन अधर्म करते. ठकाची साधनेही दुष्टतेची असतात; दीन आपल्या वाजवी हक्काचे समर्थन करीत असता ठक खोट्या शब्दांनी दुर्बलांचा नाश करण्याच्या दुष्ट युक्ती योजतो. पण थोर पुरुष थोर गोष्टी योजतो व थोर गोष्टींना धरून राहतो.