यशया 31
31
मिसरी लोक मानव आहेत, देव नाहीत
1जे साहाय्यार्थ खाली मिसर देशात जातात व घोड्यांवर भिस्त ठेवतात, आणि रथ बहुत आहेत व घोडेस्वार फार बळकट आहेत म्हणून त्यांवर भरवसा ठेवतात, पण इस्राएलाच्या पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाहीत, परमेश्वराचा शोध करीत नाहीत, त्यांना हायहाय!
2तरी तोही सुज्ञ आहे, तो अरिष्ट आणील, आपली वचने मागे घेणार नाही; तर दुष्कर्म्यांच्या घराण्यावर व अधर्म करणारे ह्यांच्या कुमकेवर उठेल.
3मिसरी तर मानव आहेत, देव नाहीत; त्यांचे घोडे रक्तमांसाचे आहेत, आत्मरूप नाहीत; परमेश्वर आपला हात उगारील तेव्हा साहाय्यकर्ता ठोकर खाईल व साहाय्य पावलेलाही पडेल; ते सर्व एकंदर विनाश पावतील.
4परमेश्वर मला म्हणाला, “जसा सिंह, तरुण सिंह, आपल्या भक्ष्यावर गुरगुरत असता, मेंढरांची टोळी बोलावून त्याच्यावर घातली तरी त्यांच्या आरोळीने घाबरायचा नाही व त्यांच्या गोंगाटाने दबायचा नाही, तसा सेनाधीश परमेश्वर सीयोन डोंगरावर त्याच्या टेकडीवर लढायला उतरेल.”
5पक्षी जसे पाखर घालतात तसा सेनाधीश परमेश्वर यरुशलेमेचे रक्षण करील; तो तिचा बचाव करून तिला सोडवील, तो तिला ओलांडून तिला सुरक्षित राखील.
6इस्राएल वंशजांनो, ज्याच्याशी तुम्ही फितुरी केली आहे त्याच्याकडे वळा.
7त्या दिवशी तुम्ही आपल्या हातांनी रुप्याच्या व सोन्याच्या मूर्ती करून पापात पडला; त्यांचा ते सगळे त्याग करतील.
8“अश्शूर तलवारीने पडेल पण मनुष्याच्या नव्हे; मनुष्याची नव्हे अशी तलवार त्याला ग्राशील; तो तलवारीपुढून पळेल; त्याच्या तरुण पुरुषांना वेठीस धरतील.
9त्याचे अधिपती भयाने पळून जातील व त्याचे सरदार झेंडा पाहून घाबरतील;” ज्याचा अग्नी सीयोनेत आहे व ज्याची भट्टी यरुशलेमेत आहे, तो परमेश्वर असे म्हणतो.
सध्या निवडलेले:
यशया 31: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.