परमेश्वर म्हणतो, “फितुरी मुले हायहाय करतील; ती मसलती करतात पण त्या माझ्या प्रेरणेने करीत नाहीत; ती करारमदार करतात पण माझ्या आत्म्याला अनुसरून करीत नाहीत; अशी ती पापाने पाप वाढवतात; ती फारोचा आश्रय करण्यासाठी व मिसराच्या छायेत लपण्यासाठी माझ्या तोंडचे वचन विचारून न घेता मिसराची वाट धरतात! म्हणून फारोचा आश्रय तुम्हांला लज्जेस कारण होईल, व मिसराच्या छायेत लपणे तुम्हांला फजितीस कारण होईल. त्याचे (यहूदाचे) सरदार सोअनात दाखल झाले आहेत व त्याचे वकील हानेसाला पोहचले आहेत. तरी त्या लोकांबद्दल त्या सर्वांना लज्जा प्राप्त होईल, त्यांपासून त्यांना काही लाभ व्हायचा नाही, त्यांपासून त्यांना साहाय्य व उपयोग न होता लज्जा व अप्रतिष्ठा ह्या प्राप्त होतील.” दक्षिणेतल्या पशूंविषयीची देववाणी : ज्यात सिंहीण व सिंह, सर्प व उडता आग्या साप ही असतात अशा कष्टमय व संकटमय देशात जवान गाढवांच्या पाठीवर आपली दौलत व उंटांच्या मदारींवर आपले खजिने लादून ज्याच्यापासून काही लाभ होणार नाही अशा राष्ट्राकडे ते घेऊन जातात. मिसराचे साहाय्य कवडीमोल व व्यर्थ ठरेल, म्हणून ह्या मिसरास “राहाब म्हणजे स्वस्थ बसणारे महामुख” असे नाव मी देतो. तर आता चल, त्यांच्यासमक्ष हे पाटीवर लिही, टिपून ठेव म्हणजे ते पुढील पिढ्यांसाठी युगानुयुग राहील. कारण हे बंडखोर लोक आहेत, ही लबाड मुले आहेत; ज्यांना परमेश्वराचे नियमशास्त्र ऐकायला नको अशी ही मुले आहेत. ते द्रष्ट्यांना म्हणतात, “दृष्टान्त पाहून नका”; संदेष्ट्यांना म्हणतात, “आम्हांला यथार्थ गोष्टींचा संदेश सांगू नका, आम्हांला गोडगोड गोष्टी सांगा, कपटवचने सांगा; मार्गातून निघा, वाटेवरून दूर व्हा, आमच्यासमोरून इस्राएलाच्या पवित्र प्रभूस दूर करा.” ह्यामुळे इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणतो, “तुम्ही ह्या वचनाचा धिक्कार करून बलात्कार व कुटिलाचार ह्यांवर भिस्त ठेवता व अवलंबून राहता; म्हणून एकाएकी कोसळून पडणार्या उंच भिंतीच्या सुटलेल्या भागाप्रमाणे ह्या अधर्माचे तुम्हांला अकस्मात फळ मिळेल; कुंभाराच्या मडक्याचा सपाट्यासरसा चुराडा होतो आणि पडलेल्या तुकड्यात आगटीतून विस्तव घेण्यास किंवा हौदातून पाणी घेण्यास खापरीही सापडत नाही, तसा तो त्याचा चुराडा करील.” कारण प्रभू परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणाला, “मागे फिरणे व स्वस्थ राहणे ह्यांत तुमचा बचाव आहे; शांतता व श्रद्धा ह्यांत तुमचे सामर्थ्य आहे.” तरी तसे तुम्ही करीत नाही.
यशया 30 वाचा
ऐका यशया 30
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशया 30:1-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ