YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 3

3
यहूदा व यरुशलेम ह्यांचा परमेश्वराकडून न्याय
1पाहा, प्रभू, सेनाधीश परमेश्वर, हा यरुशलेम व यहूदा ह्यांचा आधार व टेका काढून घेतो, म्हणजे भाकरीचा सर्व आधार व पाण्याचा सर्व आधार काढून घेतो;
2वीर व योद्धा, न्यायाधीश व संदेष्टा, दैवज्ञ व वडील,
3पन्नासांचा नायक, प्रतिष्ठित पुरुष, मंत्री, शिल्पप्रवीण व मंत्रनिपुण ह्यांना काढून घेतो.
4मी मुलांना त्यांचे अधिपती करीन; त्यांच्यावर पोरकटपणाचा अंमल चालेल.
5हा त्याला व तो ह्याला, असे लोक एकमेकांना पिडतील; मुलगा वडिलांशी व हलका प्रतिष्ठितांशी दांडगाईने वर्तेल.
6कोणी आपल्या वडिलांच्या घरात भावाचा हात धरून म्हणेल, “तुला वस्त्रप्रावरण आहे तर तू आमचा अधिकारी हो, ही मोडतोड आपल्या हाती घे”;
7त्या दिवशी तो ओरडून म्हणेल, “मी दुरुस्ती करणारा होणार नाही, माझ्या घरी अन्नवस्त्र नाही, मला लोकांचा नायक करू नका.”
8यरुशलेम कोसळली आहे, यहूदा पतन पावला आहे; कारण त्यांची जिव्हा व त्यांची कृत्ये परमेश्वराविरुद्ध असून ते त्याच्या तेजोमय नेत्रांना तुच्छ लेखतात.
9त्यांची मुद्रा त्यांच्याविरुद्ध साक्ष देते; ते सदोमाप्रमाणे आपले पाप जाहीर करतात, लपवत नाहीत; त्यांच्या जीविताला धिक्कार असो; ते स्वतःचे वाईट करून घेतात.
10नीतिमानांविषयी म्हणा की त्यांचे कल्याण होणार; कारण ते आपल्या कृत्यांचे फळ उपभोगणार.
11दुष्ट हायहाय करणार; त्याचे वाईट होणार; कारण त्याने आपल्या हातांनी जे केले त्याचे फळ त्याला मिळेल.
12माझ्या लोकांविषयी म्हणाल तर पोरे त्यांना पिडतात; स्त्रिया त्यांच्यावर अधिकार चालवतात. हे माझ्या प्रजे, तुझे नेते तुला बहकवतात; त्यांनी तुझ्या जाण्याच्या वाटा बुजवून टाकल्या आहेत.
13परमेश्वर वाद चालवण्यास उभा आहे; राष्ट्रांचा न्याय करण्यास उभा आहे.
14परमेश्वर आपल्या लोकांचे वडील व सरदार ह्यांचा निवाडा करील : “तुम्हीच द्राक्षीचा मळा खाऊन टाकला आहे; दीनांची लूट तुमच्या घरात आहे.
15तुम्ही माझ्या लोकांना चिरडता, दीनांचे तोंड ठेचता, हे काय?” असे प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याचे म्हणणे आहे.
सीयोनकन्यांचा न्याय
16परमेश्वर असेही म्हणतो : सीयोनेच्या कन्या गर्विष्ठ आहेत, त्या मान ताठ करून व डोळे मारत चालतात, आपल्या पायांतील नूपुरांचा छमछम आवाज करीत ठुमकत चालतात;
17म्हणून प्रभू सीयोनेच्या कन्यांच्या माथ्यांवर खवडे उठवील व परमेश्वर त्यांची गुह्यांगे उघडी करील.
18तो त्या दिवशी पैंजण, बिंद्या व चंद्रकोरी,
19बाळ्या, तोडे, जाळ्या,
20शिरोभूषणे, साखळ्या, कंबरपट्टे, अत्तरदाण्या व ताईत,
21अंगठ्या व नथी,
22भपक्याचा पोशाख, कुडती. शाली, बटवे,
23आरसे, मलमलीची वस्त्रे, दुपट्टे व ओढण्या ह्यांची शोभा नाहीशी करील.
24आणि मधुर सुवासाच्या जागी कुजल्याची घाण, कंबरपट्ट्यांच्या जागी दोरी, वेणीफणी केलेल्या केसांच्या जागी टक्कल, झग्याच्या जागी गोणपाटाचे वेष्टण व सौंदर्याच्या जागी वण असे होईल.
25तुझे पुरुष तलवारीने पडतील, तुझे वीर लढाईत पडतील.
26तेव्हा तिच्या वेशी आकांत करतील, शोकाकुल होतील व ती एकटी1 होऊन भुईवर बसेल.

सध्या निवडलेले:

यशया 3: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन